मुंबईतल्या घरांच्या किमतीचं काय घेऊन बसलात राव; 'या' शहरातील घरं खाऊन जाताहेत भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 02:04 AM2020-06-15T02:04:12+5:302020-06-15T02:05:33+5:30

पुण्यातील घरांच्या किमती ६७ टक्क्यांनी तर, मुंबई महानगर क्षेत्रातील किंमती ३३ टक्क्यांनी वाढल्या

Housing prices in Pune have been higher than in Mumbai for the last decade | मुंबईतल्या घरांच्या किमतीचं काय घेऊन बसलात राव; 'या' शहरातील घरं खाऊन जाताहेत भाव

मुंबईतल्या घरांच्या किमतीचं काय घेऊन बसलात राव; 'या' शहरातील घरं खाऊन जाताहेत भाव

Next

मुंबई : मुंबईतल्या घरांचे भाव गगनाला भिडत असल्याची चर्चा आपण नेहमीच ऐकतो. मात्र, गेल्या दशकातील घरांच्या किमतीतल्या वाढीवर जर दृष्टिक्षेप टाकला तर मुंबईपेक्षा पुण्यातील घरांचे भाव जास्त वेगाने वधारतोय असल्याचे निष्पन्न होते. पुण्यातील घरांच्या किमती ६७ टक्क्यांनी तर, मुंबई महानगर क्षेत्रातील किंमती ३३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. देशातील सात प्रमुख शहरांपैकी पुण्यातील किमती वाढण्याचा वेग सर्वाधिक आहे.

अ‍ॅनरॉक प्रॉपर्टी या सल्लागार संस्थेने २०१० ते २०२० या कालावधीतल्या घरांच्या किमती कशा पद्धतीने वाढल्या आहेत त्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यातून ही माहिती हाती आली आहे. पुणे परिसरात २००९ साली प्रति क्षेत्रफळासाठी सरासरी दर ३३०० रुपये होता. तो आता ५५१० रुपयांवर झेपावला आहे. मुंबई महानगर क्षेत्रात तो दर ७ हजार ९६५ वरून १० हजार ६१० रुपयांपर्यंत वाढला आहे.

बंगळूरू शहराचा विचार केल्यास दरांमधील वाढ ३३४५ वरून ४९७५ एवढी झाली असून वाढीचा टक्का ४९ आहे. तर, दिल्ली परिक्षेत्रातील वाढीचा वेग सर्वात कमी १९ टक्के आहे. तिथे घरांचे दर ३८५० वरून ४५८० पर्यंत वाढली आहे. देशातील सर्व सात प्रमुख शहरांचा विचार केल्यास दरांमध्ये झालेली सरासरी वृध्दी ३८ टक्के आहे. मुंबईतल्या वाढीचा दर सरासरीपेक्षा जरी कमी असला तरी तिथले दर आजही देशात सर्वाधिक असल्याचे या अहवालातून निष्पन्न होते.

पुणे परिसरात प्रति क्षेत्रफळासाठी सरासरी दर ५५१० रुपये आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात तो दर ७ हजार ९६५ वरून १० हजार ६१० रुपयांपर्यंत वाढला आहे.

Web Title: Housing prices in Pune have been higher than in Mumbai for the last decade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई