मुंबई : जवळपास अडीच वर्षे स्थिर असलेल्या रेडीरेकनरच्या दरांमध्ये बदल झाल्यानंतर उच्चभ्रूंची वसाहत असलेल्या मलबार हिल परिसरातील १८ झोनपैकी काही झोनच्या दरांमध्ये १० टक्के कपात ते पाच टक्के वाढ झाली आहे. निवासी दरांमध्ये कंबाला हिल झोनचे दर सर्वाधिक असून प्रति चौरस फुटांसाठी सरकारने ८६ हजार ९६१ रुपये दर निश्चित केला आहे. त्याखालोखाल कुलाबा, वरळी आणि लोअर परेल या भागांचा क्रमांक लागतो.राज्य सरकारने गेल्या आठवड्यात रेडीरेकनरचे नवे दर घोषित केले. त्यात ०.६ टक्के कपात झाल्याचे सांगितले जात असले तरी ती कपात फसवी आहे. बहुसंख्य ठिकाणच्या निवासी भागांचे दर हे जैसे थे असून काही ठिकाणी दरवाढही झाली आहे. मुंबईतल्या ८७३ झोनच्या दरांवर नजर टाकल्यास मलबार हिल परिसरातील दर सर्वाधिक असल्याचे अधोरेखित होते.इथे सर्वाधिक दर असलेल्या भागांत एक हजार चौरस फुटांचे घर विकत घ्यायचे असले तर ८ कोटी ७० लाख रुपये ही किमान किंमत सरकारने निश्चित केली आहे. ती गृहीत धरून त्यावर मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. प्रत्यभात बाजारभावानुसार या ठिकाणच्या घरांची किंमत ही रेडीरेकनरच्या सव्वापट असल्याचे सांगितले जाते. याच भागात व्यावसायिक मालमत्तांसाठी प्रति चौरस फूट १,१३,६२० असा दर आहे.मलबार हिलपाठोपाठ कुलाबा परिसरातील दर दुसऱ्या क्रमांकावर असून तिथला सर्वाधिक दर हा ६८ हजार ४७० रुपये प्रति चौरस फूट आहे. त्याखालोखाल वरळी (६४,५८०) आणि लोअर परेल (५२,३६०) या भागाचा क्रमांक लागतो. या दोन्ही ठिकाणी व्यापारी जागांसाठी ७५,७७६ आणि ७६,६१० हजार रुपये प्रति चौरस फूट असा दर आहे.मुंबईत सर्वाधिक दर असलेले भाग (दर प्रति चौरस फूट)विभाग जमीन निवासी आॅफिस दुकाने औद्योगिकमलबार हिल ४५,१६३ ८६,९६१ ९५,६२५ १,१३,७६२ ८६,९६१कुलाबा ३०,१३५ ६८,४७० ७९,५७० ९०,१५८ ६८,४७०लोअर परेल २२,४२९ ५२,३६० ६५,१२० ७६,६१० ५२,३६०वरळी ३१,८५० ६४,५८० ६९,५१४ ७५,७७६ ६२,६०६
मलबार हिलमधील घरांचे दर प्रति चौ. फूट ८७ हजार , रेडी रेकनरमध्ये बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 7:55 AM