पाच हजार घरांची गृहनिर्माण योजना रखडली; इतर गटातील कुटुंबांना घरे मिळणार कशी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:04 IST2025-01-02T13:04:33+5:302025-01-02T13:04:55+5:30

...परिणामी अत्यल्प-अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना परवडणारी घरे देता येत नाहीत, अशी खंत म्हाडाने व्यक्त केली आहे.

Housing scheme for 5,000 houses stalled; How will families from other groups get houses? | पाच हजार घरांची गृहनिर्माण योजना रखडली; इतर गटातील कुटुंबांना घरे मिळणार कशी? 

पाच हजार घरांची गृहनिर्माण योजना रखडली; इतर गटातील कुटुंबांना घरे मिळणार कशी? 

मुंबई : सुमारे १ लाख १८ हजार २१२ चौरस मीटर राखीव क्षेत्र एफएसआय / टीडीआरच्या बदल्यात १२ बिल्डर म्हाडाला देण्यास तयार आहेत. ते मिळाले तर नाशिकमध्ये अत्यल्प, अल्प उत्पन्न गटांसाठी सुमारे ५ हजार घरांची गृहनिर्माण योजना राबविता येईल. मात्र नाशिक महापालिकेकडून त्या १२ बिल्डरांना एफएसआय / टीडीआर मिळत नसल्याने त्यांनी राखीव क्षेत्र म्हाडाकडे हस्तांतरित केलेले नाही. परिणामी अत्यल्प-अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना परवडणारी घरे देता येत नाहीत, अशी खंत म्हाडाने व्यक्त केली आहे.

एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०२० नुसार २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत राखीव क्षेत्र म्हाडाला विनामूल्य देणाऱ्या बिल्डरला एफएसआय / टीडीआर मिळण्याची तरतूद आहे. त्यानुसार, म्हाडाला सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेकरिता देण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात बिल्डरला नाशिक महापालिकेतर्फे एफएसआय / टीडीआर मिळणे गरजेचे आहे. 

म्हाडाचे नाशिक महापालिकेला पत्र 
- म्हाडाचे मुख्य अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि नाशिकच्या क्रेडाई प्रतिनिधींशी २४ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या बैठकीत नाशिक महापालिकेने घेतलेल्या भूमिकेला आता सात महिने झाले आहेत. 
- मात्र अद्याप काहीच बदल झालेला नाही. नाशिक महापालिकेमार्फत बिल्डरांना एफएसआय / टीडीआर मिळत नसल्याने अनेक बिल्डरांनी म्हाडाला राखीव क्षेत्र देण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे. 
- त्यामुळे पुढील सर्व प्रक्रिया रखडल्या असून, याबाबत सहकार्य करावे, असे विनंती पत्र म्हाडाने नाशिक महापालिकेला पाठविले आहे.

Web Title: Housing scheme for 5,000 houses stalled; How will families from other groups get houses?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.