गृहनिर्माण क्षेत्राने दिली ३३० खाटांची जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:07 AM2021-04-23T04:07:37+5:302021-04-23T04:07:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गृहनिर्माण उद्योगाशी संबंधित क्रेडाई एमसीएचआय या संघटनेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गृहनिर्माण उद्योगाशी संबंधित क्रेडाई एमसीएचआय या संघटनेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय व पायाभूत सुविधांची मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी आतापर्यंत ३३०हून अधिक खाटांची जागा आणि पायाभूत सुविधा दिल्या असून, यात आणखी वाढ होणार आहे.
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांचे लसीकरण आणि बांधकामच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना राबविण्याबरोबरच काही कमर्शिअल प्रॉपर्टींजचे पालिकेच्या सहयोगाने कोविड सेंटर्समध्ये रूपांतर करण्यात आले आहे. क्रेडाई एमसीएचआयचे अध्यक्ष दीपक गोराडिया यांनी सांगितले की, मुंबई महानगर प्रदेशाच्या आरोग्य सुविधांवर प्रचंड ताण आला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी विकासक मुंबई पालिकेच्या मदतीने सरकारला मदत करण्याचा प्रयत्न करत असून, या महामारीचे आव्हान परतवून लावण्यासाठी आपले योगदान देत आहेत.
..................................................
-------------
ठिकाण आणि खाटा
रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर - १५०
नेहरु विज्ञान केंद्र, वरळी - १२०
कमर्शियल कॉम्पलेक्स - ६०
एकूण ३३०