खबरदारीसाठी हाऊसिंग सोसायट्यांनी ऑक्सिजन सिलिंडर ठेवावेत - डॉ.समदानी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 12:51 AM2020-06-12T00:51:20+5:302020-06-12T00:51:26+5:30

मुंबईतील नामवंत इस्पितळांमध्ये सेवा देत असलेले डॉ. समदानी हे स्वत: कोविडयोद्धा आहेत.

Housing societies should keep oxygen cylinders as a precaution - Dr. Samdani | खबरदारीसाठी हाऊसिंग सोसायट्यांनी ऑक्सिजन सिलिंडर ठेवावेत - डॉ.समदानी

खबरदारीसाठी हाऊसिंग सोसायट्यांनी ऑक्सिजन सिलिंडर ठेवावेत - डॉ.समदानी

Next

मुंबई : एखाद्याला अचानक श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि आॅक्सिजनची कमतरता असेल तर अशावेळी हाऊसिंग सोसायट्यांनी किंवा व्यक्तिगत पातळीवरही आॅक्सिजन सिलिंडर/ कॉन्सन्ट्रेटर इमर्जन्सी म्हणून बाळगायला हवे त्याचा वापर केल्यास हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत नेईपर्यंत रुग्ण ठीक राहू शकेल असे मत प्रख्यात फिजिशियन आणि इंटेन्सिव्हीस्ट तसेच मुंबईतील नामवंत इस्पितळांचे कन्सल्टंट फिजिशियन डॉ. प्रतित समदानी यांनी व्यक्त केले.

मुंबईतील नामवंत इस्पितळांमध्ये सेवा देत असलेले डॉ. समदानी हे स्वत: कोविडयोद्धा आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर यशस्वी उपचार करीत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती लोकमत डॉट कॉमशी संवाद साधताना त्यांनी सामान्य माणसांना कोरोनाबाबत पडत असलेल्या प्रश्नांची अत्यंत अभ्यासपूर्ण उत्तरे दिली.
कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती कशी वाढवावी?
डॉ.समदानी : प्रतिकारशक्ती मोजण्याची कुठलीही टेस्ट नाही. ती एका दिवसात वाढवता येत नाही. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन बी, सी,ई, डी निश्चितपणे मदत करतात. ते घेतल्यास उपयोगच होतो फक्त व्हिटॅमिन डी घेताना आधी त्याच्या शरीरातील प्रमाणाबाबत टेस्ट करून घेणे योग्य ठरेल. लाल रंगाच्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. आयुष मंत्रालयाने गरम पाणी,गुळण्या हळद,तुळस,लसूण व इतर आयुर्वेदिक उपचार सांगितले आहेत ते देखील अतिशय फायदेकारक ठरतात. होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या ओव्हरडोस घेऊ नका.
व्यायाम करताना मास्क लावावा का असा प्रश्न अनेकांना पडतो...
डॉ. समदानी - घरच्या घरी हलके व्यायाम करत असाल किंवा सार्वजनिक ठिकाणी हलके व्यायाम घेत असाल तर मास्क लावायला हरकत नाही. मात्र वेगाने धावताना,एरोबिक करताना, जोरात व्यायाम करताना मास्क लावू नये.कारण तसे केल्यास श्वसनाचा त्रास अचानक होऊ शकतो. व्यायाम करताना शारीरिक अंतर ठेवा. अडीच महिन्यानंतर आपण पण समाजात वावरत असताना सामाजिक अंतर हा शब्द योग्य ठरणार नाही मात्र त्याच वेळी शारीरिक अंतर महत्त्वाचे आहे. व्यायामासाठी एकाचवेळी गर्दी करू नका.
फळे आणि कच्चा भाजीपाला सॅनेटाईझ कसा करायचा? टेक अवे फूडचा वापर करावा का?
डॉ. समदानी - बाहेरून आणलेली फळे व भाज्या सॅनेटाइज केल्याच पाहिजेत. हे दोन्ही किमान १५ मिनिटे गरम पाण्यात ठेवावा. हे करताना त्यात थोडी पोटॅशियम परमॅग्नेटची पावडर टाका. शक्य असेल तर फळ साल काढून खा. टेक अवे फूड, डेलिव्हरी फुड सुरक्षित आहेत. फक्त डिलीव्हरी बॉयकडून डिलिव्हरी घेताना खबरदारी बाळगा. थेट संपर्क टाळा.या अन्नातून कोरोना आपल्या घरात येईल ही शंका अनाठायी आहे. बाहेरून आलेले आणलेले अन्न गरम करून घ्या.ज्या डब्यात ते आणले तो डबा वापरू नका.

फेस शिल्ड आणि मास्क यापैकी कुठल्या एकाचा वापर केला तर चालेल का?
डॉ. समदानी - दोन्हींचा वापर केला तर हरकत नाही परंतु दोनपैकी एकाचा वापर करायचा असेल तर मास्कचाच वापर करायला हवा. एन ९५ हे हेल्थ केअर वर्कर्ससाठी आहेत आम जनतेसाठी थ्री प्लाय मास्क वापरणे योग्य राहील.
अनेक खासगी इस्पितळांमध्ये नॉन कोविड रुग्णांना भरती करण्यापूर्वी कोविड टेस्टचे रिपोर्ट मागतात हे कितपत योग्य आहे?
डॉ. समदानी - सगळ्या इस्पितळांमध्ये नॉनकोविड रुग्णांना आधी भरती करून घेतले जाते.त्यांची तत्काळ कोविड चाचणी केली जाते व आलेल्या अहवालाच्या आधारे कोविड किंवा नॉनकोविड वार्डात त्यांच्यावर उपचार केले जातात.
आपण एक सामाजिक भान असलेले डॉक्टर आहात कोरोनासोबत चालताना समाजाची मानसिकता कशी असेल आणि कोरोनामुक्त समाज कधी बघायला मिळेल असे आपल्याला वाटते ?
डॉ. समदानी - अनेक मानसिक प्रश्न तयार होतील. अशावेळी सामाजिक अंतर कमी करताना शारीरिक अंतर सुरक्षित ठेवावे लागेल एकमेकांशी संपकार्साठी अत्याधुनिक साधनांचा वापर करा मानसिक तणाव असलेले अनेक रुग्ण आमच्याकडे आता येत आहेत. साधारणत नऊ महिने ते एक वर्षाच्या आत कोरोनावर निश्चितपणे येईल असा मला विश्वास वाटतो. तसेही सप्टेंबरपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी कमी होत जाईल. भयमुक्त, कोरोनामुक्त समाज एक डॉक्टर म्हणून मला बघायचा आहे.

डॉ. समदानी म्हणाले की एक लिटरपर्यंतचे आॅक्सीजन सिलिंडर वापरून इस्पितळातपर्यंत नेताना रुग्णाचा त्रास नियंत्रणात आणता येऊ शकतो किंवा रुग्णाला इस्पितळात भरती करण्यासाठी काही अवधी लागणार असेल तरीदेखील हेच सिलिंडर अतिशय महत्त्वाचे ठरू शकते.

कोरोना पॉझिटिव्ह असल्यास
तत्काळ कोणती पावले उचलावीत?
डॉ. समदानी - कोरोना पॉझिटिव्ह झालात म्हणजे आयुष्य संपले असे घाबरण्याचे काहीही कारण नाही. कोरोनाचे ९५ टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण उपचारांनी चांगले होत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असेल आणि लक्षणे फारशी नसतील, श्वास जास्त लागत नसेल, बारीक ताप असेल, घसा खवखवत असेल, थोडं डोकं दुखत असेल, एखाद्या गोष्टीचा गंध येत नाही तर अशा रुग्णावर घरीच उपचार करता येऊ शकतात. श्वास घेताना खूप त्रास होतोय ताप खूप आहे चक्कर येत आहेत तेव्हा इस्पितळात जाण्याची गरज असते परंतु बहुतेक रूग्णांवर घरीच उपचार करता येऊ शकतात.

Web Title: Housing societies should keep oxygen cylinders as a precaution - Dr. Samdani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.