- जयंत होवाळमुंबई - दक्षिण मुंबईत फ्री वे (ऑरेंज गेट ) ते ग्रॅन्टरोड दरम्यान एलिव्हेटेड रस्त्याच्या कामाचे टेंडर महापालिकेने दिले खरे, मात्र सुरुवातीला ६६२ कोटींचा असणारा हा प्रकल्प थेट १३३० कोटींचा कसा होऊ शकतो, काही महिन्यात प्रकल्पाची किंमत थेट दुप्पट कशी शकते असा सवाल पालिकेतील माजी गटनेते रवी राजा यांनी केला .
ज्या कंपनीला एलिव्हेटेड रस्त्याचे काम हे काम दिले आहे, त्या कंपनीला सांताक्रूझ-चेंबूर रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे केले म्हणून एमएमआरडीएने दंड केला होता. त्याच कंपनीला काही वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकले होते. अशी कंपनी काम नीट करेल याची खात्री आहे का, काम वेळेत न झाल्यास महापालिका प्रशासन कंपनीवर कारवाई करणार का, असा सवालही त्यांनी केला.
उड्डाणपुलाच्या कामासाठी जानेवारी २०२४ मध्ये निविदा मागवण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात कमी बोलीची निविदा पात्र ठरली. त्यानंतर कंत्राट देण्यात आले.फ्री वे ऑरेंज गेट ते ग्रॅन्टरोड मधील ताडदेव व नाना चौक या अंतरासाठी सध्या ३० ते ४० मिनिटे लागतात. उडडाणपुलामुळे हे अंतर सात मिनिटात पूर्ण करता येईल. फ्रीवे ऑरेंज गेटपासून राठोड मार्ग, हँकॉक पूल, रामचंद्र भट्ट मार्ग, जे.जे. उड्डाणपूल, एम.एस. अली मार्ग व पठ्ठे बापूराव मार्ग असा उड्डाणपुलाचा मार्ग आहे.
उडडाणपुलाची वैशिष्ट्ये रुंदी : ४ ते १२ मीटरहँकॉक पूल येथील मध्य रेल्वे मार्ग ओलांडण्याकरिता पुलाचे बांधकाम केबल स्टेड पद्धतीचे असेल.हार्बर मार्गावरील रेल्वे मार्गावरील रेल्वे पूल ओलांडण्याकरिता बॉस्ट्रिंग पद्धतीचा पोलादी पूल आणि आरसीसी डेकपठ्ठे बापूराव मार्गावरील पुलाचे बांधकाम १०० मीटर लांबीच्या स्टील डेकचे असेल.