सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 07:33 AM2019-08-24T07:33:40+5:302019-08-24T07:39:41+5:30

विमा कंपन्यांच्या भूमिकेमुळे पात्र शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

How can 90 lakh Maharashtra farmers be ineligible for PM crop insurance, asks Uddhav Thackeray | सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या - उद्धव ठाकरे

सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या - उद्धव ठाकरे

googlenewsNext
ठळक मुद्देविमा कंपन्यांच्या भूमिकेमुळे पात्र शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. 'सरसकट सर्व शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई न द्यावी. अन्यथा, विमा कंपन्यांसोबतच्या चर्चेचे आंदोलनात रूपांतर होईल.'पीक विमा योजनेची अंमलबजावणी व विमा कंपन्यांच्या कारभारावर ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मुंबई - विमा कंपन्यांच्या भूमिकेमुळे पात्र शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केला. राज्यात तब्बल ९० लाख शेतकरी योजनेस अपात्र ठरले आहेत. त्यामुळे सरसकट सर्व शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई न द्यावी. अन्यथा, विमा कंपन्यांसोबतच्या चर्चेचे आंदोलनात रूपांतर होईल, असा इशारा ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.

पीक विमा योजनेची अंमलबजावणी व विमा कंपन्यांच्या कारभारावर ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही योजना कंपन्यांच्या फायद्यासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असल्याचे सांगत सरसकट सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेंतर्गत भरपाई देण्याची मागणी केली. पीक विम्याचे २ हजार कोटी रुपये विमा कंपन्यांकडे पडून आहेत. तब्बल ९० लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरविल्यानंतर त्यांनी ही रक्कम नफ्यात वळती केली.

या योजनेत विमा कंपन्यांकडे येणारा पैसा हा सामान्य शेतकरी आणि सरकारकडून जमा होतो. त्यामुळे हा करदात्यांचा पैसा आहे. कंपन्यांचा नफा वगळून इतर सर्व पैसे शेतकऱ्यांना मिळायला हवेत. कंपन्या देत नसतील तर सरकारने तो पैसा परत घेऊन अन्य यंत्रणेमार्फत तो शेतकºयांपर्यंत पोहोचवायला हवा, असे ठाकरे म्हणाले. शिवसेनेने आवाज उठवल्यानंतर दहा लाख शेतकºयांना आतापर्यंत ९६० कोटी रुपयांची भरपाई मिळाली. यापुढेही शिवसेना या विषयाचा पाठपुरावा करेल, असे ठाकरे म्हणाले.

 

Web Title: How can 90 lakh Maharashtra farmers be ineligible for PM crop insurance, asks Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.