महागाई भत्ता कसा मोजला जातो? पगारीत अशी होते वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 10:32 AM2021-06-28T10:32:59+5:302021-06-28T10:33:31+5:30
सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष महागाई भत्त्याच्या (डीए) वाढीकडे लागले आहे. कोरोनामुळे गेल्या एक-दीड वर्षापासून ही वाढ रोखण्यात आली होती. यासंदर्भात जाणून घेऊया की...
लोकमत न्यूज नेटवर्क : सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष महागाई भत्त्याच्या (डीए) वाढीकडे लागले आहे. कोरोनामुळे गेल्या एक-दीड वर्षापासून ही वाढ रोखण्यात आली होती. यासंदर्भात जाणून घेऊया की... महागाई भत्ता मोजण्याचे गणित नेमके काय आहे?
महागाई भत्ता म्हणजे काय?
n अनेक घटकांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या
किमती सतत बदलत असतात. त्यामुळे महागाई वाढत असते.
n कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करता यावा यासाठी महागाई भत्त्याची निर्मिती करण्यात आली.
n केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारक यांना महागाई भत्ता दिला जातो.
n दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्याचा आढावा घेऊन त्यात वाढ केली जाते. कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या आधारे महागाई भत्त्याची गणना केली जाते.
n महागाई भत्ता शहरी, निमशहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी
वेगवेगळा असतो.
महागाई भत्त्याचे
सूत्र कसे असते?
n अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकावर (ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स) महागाई भत्त्याचे सूत्र आधारलेले असते.
n १२ महिन्यांच्या निर्देशांकाची सरासरी ११५.७६/११५.७६×१०० असे हे सूत्र आहे.
अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक काय असतो?
n भारतात २ प्रकारची महागाई असते. एक किरकोळ व दुसरी घाऊक.
n किरकोळ महागाई सामान्य ग्राहकांकडून दिल्या जाणाऱ्या किमतींवर आधारलेली असते. त्यास ग्राहक मूल्य निर्देशांक (सीपीआय) असेही म्हटले जाते.
महागाई
भत्त्यातील वाढीचा फायदा काय?
n महागाई भत्त्यात
वाढ झाली की पगारात वाढ होते.
n सद्य:स्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई
भत्ता १७ टक्के आहे.
n नजीकच्या काळात
त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
n उदाहरणार्थ एखाद्याचे मूळ वेतन २५ हजार असेल तर त्याच्या वेतनात वाढीव डीएनुसार वाढ हाेईल.
महागाई भत्त्यात वाढ झाल्यास त्याचा लाभ ६५ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळेल.
केंद्राने जानेवारी, २०२० मध्ये ४ टक्के, जून, २०२० मध्ये ३ टक्के आणि जानेवारी, २०२१ मध्ये ४ टक्के वाढ घोषित केली होती. मात्र, कोरोनामुळे महागाई भत्त्यातील ही वाढ लागू करण्यात आली नव्हती.