Join us

कशी वाटली बम्बार्डियर?

By admin | Published: March 23, 2015 12:33 AM

पश्चिम रेल्वेमार्गावर नवी बम्बार्डियर लोकल चालविण्यात आली; मात्र ही लोकल धावताच नानाविध प्रतिक्रिया उमटल्या. नव्या लोकलचे आश्चर्यही अनेक प्रवाशांना वाटले.

मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावर नवी बम्बार्डियर लोकल चालविण्यात आली; मात्र ही लोकल धावताच नानाविध प्रतिक्रिया उमटल्या. नव्या लोकलचे आश्चर्यही अनेक प्रवाशांना वाटले. ही लोकल प्रवाशांच्या पसंतीस उतरली की नाही? या लोकलमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे का? यावर प्रवाशांचे मत घेतानाच त्यांच्या सूचनाही विचारात घेण्याचा निर्णय एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) घेतला आहे. यासाठी १० प्रश्न असलेला एक फॉर्मच एमआरव्हीसीकडून तयार करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर सध्या दोन बम्बार्डियर लोकल दाखल झाल्या असून, चर्चगेट ते अंधेरी, बोरीवली आणि विरारपर्यंत त्या धावतात. या दोन लोकलबरोबरच आणखी ७० नव्या लोकल एमआरव्हीसीकडून २०१६पर्यंत टप्प्याटप्प्यात येणार आहेत. एकूण ७२ लोकलपैकी ३० लोकल पश्चिम रेल्वेच्या तर ४० लोकल मध्य रेल्वेच्या वाट्याला आहेत. दोन लोकल साधारणपणे दीड वर्षापूर्वीच मुंबईत दाखल झाल्या आणि त्यानंतर या लोकलच्या सातत्याने चाचण्या घेण्यात आल्या. चाचण्या सुरू असतानाच लोकलमधील दरवाजाजवळ असणारा हॅण्डल हा प्रवाशांसाठी तापदायक ठरणारा असून, तो बदलण्यात यावा अशी मागणीही यापूर्वी प्रवासी संघटनांकडून करण्यात आली होती. ही मागणी खरोखरच रास्त आहे का ते रेल्वेकडून पडताळले जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनीही लोकलमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्याबरोबरच फर्स्ट क्लासमधील आसनव्यवस्था सुधारण्यात यावी यासह १३ सूचना रेल्वे प्रशासनाला केल्या होत्या. हे पाहता एमआरव्हीसीकडून बम्बार्डियर लोकलबाबत प्रवाशांकडून प्रतिक्रिया किंवा सूचना मागविण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी १० प्रश्न असलेला एक फॉर्म एमआरव्हीसीने तयार केला आहे. साधारण एक महिना प्रवाशांच्या सूचना किंवा प्रतिक्रियांचा सर्व्हे केला जाईल, असे एमआरव्हीसीतील सूत्रांनी सांगितले. सध्या ूङ्मे@े१५ू.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवर हा फॉर्म टाकण्यात आला आहे. यावर प्रवाशांच्या प्रतिक्रिया मागितल्या जातील. तसेच नंतर रेल्वे स्थानकांवरही काही कर्मचारी नेमून प्रतिक्रिया घेण्यात येणार आहेत.बम्बार्डियरबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी केलेल्या सूचना१रेल्वेत सध्या मोठ्या प्रमाणात आगीच्या दुर्घटना घडत असून, त्या टाळण्यासाठी या बम्बार्डियर लोकलमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यात यावी. एका डब्यात १६ अग्निशमन उपकरणे बसविण्यात यावीत. प्रत्येक डब्यातील प्रत्येक दरवाजाजवळ दोन-दोन अग्निशमन यंत्रे असावीत२त्याचबरोबर धूर आल्यास ‘स्मोक डिटेक्टर’(धूर ओळखणारी यंत्रणा) यंत्रणाही डब्यात बसविण्यात यावी. यासाठी प्रत्येक डब्यात, गार्ड आणि मोटरमन केबिनमध्ये सायरनही असावा.३फर्स्ट क्लास डब्यातील आसनव्यवस्थेवर टीका करण्यात आली आहे. सेकंड क्लास डब्यातील आसनव्यवस्थेची लांबी ही ३८ सेंमी असून, फर्स्ट क्लास डब्यातील आसनव्यवस्थेची लांबी ही ३५ सेंमी आहे. त्यामुळे फर्स्ट क्लास डब्यातील आसनव्यवस्था बरोबर नसून ती सुधारण्यात यावी, अशी सूचनाही केल्याचे सांगण्यात आले. ४ड्रायव्हिंग कॅबमध्ये एअर स्प्रिंग बसविण्यात यावी. त्यामुळे या लोकलचा वेग ताशी ६0 किलोमीटरपर्यंत येण्यास मदत होईल. ५डब्यातील आसनव्यवस्था या कोपऱ्याच्या बाजूने गोलाकार नाहीत. त्यामुळे प्रवाशांना दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये बदल करण्यात यावा. ६लोकलमधील आसने तुटलेली असल्यास ती लोकल सेवेत आणू नये.७लोकलच्या बाहेरील आणि आतील बाजूने केलेल्या रंगकामाचा दर्जा चांगला नाही. तो सुधारण्यात यावा. ८डब्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत लोकल थांबवण्यासाठी असणाऱ्या साखळीऐवजी एक बटन असावे.च् सेकंड क्लास डब्यातील दोन आसनांमध्ये योग्य अंतर आहे का?च् डब्यातील प्रवासी माहिती सुविधा दिसण्यासारखी आहे का?च् फॅनची संख्या आणि अन्य विद्युत जोडण्या कशा आहेत?च् आसन व्यवस्था कशी आहे?च् व्हेंटिलेशन सुविधा योग्य आहे का?च् डब्यात उभ्या राहणाऱ्या प्रवाशांसाठी हॅण्डल सुविधा योग्य आहे का?च् मालडब्यातील उंची आणि रुंदी योग्य आहे का?च् फर्स्ट क्लासच्या डब्यातील दोन आसनांमध्ये योग्य अंतर आहे का?च् खिडक्यांचे आकार व्यवस्थित आहेत का?च् दरवाजाजवळ चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी असलेले हॅण्डल बरोबर आहे का?