बँकांना नीरव मोदी कसा दिसला नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 02:38 AM2018-02-21T02:38:12+5:302018-02-21T02:38:23+5:30

छोट्या उद्योजकांना कर्ज देताना कायम शंका उपस्थित करणा-या बँकांना नीरव मोदीला कर्ज देताना शंका का आली नाही, असा सवाल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी उपस्थित केला.

How do the banks look silent on the people? | बँकांना नीरव मोदी कसा दिसला नाही?

बँकांना नीरव मोदी कसा दिसला नाही?

Next

मुंबई : छोट्या उद्योजकांना कर्ज देताना कायम शंका उपस्थित करणाºया बँकांना नीरव मोदीला कर्ज देताना शंका का आली नाही, असा सवाल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी उपस्थित केला.
देसाई म्हणाले की, देशातील एकूण लहान उद्योगांपैकी एकट्या महाराष्ट्रात २२ टक्के उद्योग आहेत. मात्र छोट्या उद्योजकांना कर्ज देताना बँका नाना शंका उपस्थित करतात. पण विजय मल्ल्या, नीरव मोदी अशा मंडळींना कर्जे देताना बँकांना अजिबात शंका येत नाही. अशीच अडवणूक होत राहिली तर छोट्या उद्योगांच्या पतपुरवठ्यासाठी नवी व्यवस्था उभारण्यात येईल.
यशराज एरंडे यांनी एमएसएमई क्षेत्राचा आढावा घेणारे सादरीकरण केले. सुमीत गुप्ता यांनी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. येस बँकेचे सुमित गुप्ता, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे के. हरी, आॅटोमोटीव्ह सिस्टीमचे ऋषी बागला, बोस्टन कन्सल्टिंगचे यशराज एरंडे, बडवे ग्रुप आॅफ कंपनीचे श्रीकांत बडवे, केमट्रॉलचे के. नंदकुमार आदी सहभागी झाले होते.

Web Title: How do the banks look silent on the people?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.