प्रवाशांच्या जिवाशी का खेळता?

By admin | Published: February 25, 2016 12:22 AM2016-02-25T00:22:53+5:302016-02-25T00:22:53+5:30

ठाणे महापालिकेच्या ५० टक्के बसेस नादुरुस्त आहेत आणि रस्त्यावर चालणाऱ्या बसेसही सुुस्थितीत नाहीत. अशा स्थितीत प्रवाशांच्या जीवाशी का खेळताय, असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने

How do you play with your friends? | प्रवाशांच्या जिवाशी का खेळता?

प्रवाशांच्या जिवाशी का खेळता?

Next

मुंबई : ठाणे महापालिकेच्या ५० टक्के बसेस नादुरुस्त आहेत आणि रस्त्यावर चालणाऱ्या बसेसही सुुस्थितीत नाहीत. अशा स्थितीत प्रवाशांच्या जीवाशी का खेळताय, असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला बुधवारी केला.
ठाण्यात जेएनएनयूआरएमसह एकूण ४०० पेक्षा अधिक बसेस रस्त्यावरुन धावतात. त्यापैकी वागळे इस्टेट आगार मधील १४३ बस चालू आहेत. तर १३१ बस २००३ पासून बंद आहेत. तसेच कळवा आगार येथील ४६ बस चालू असून ३३ बस बंद आहेत. यासंबंधी ठाणे महापालिकेला आवश्यक ते आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते विक्रांत तावडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे होती.
‘हे अतिशय गंभीर आहे. या नादुरुस्त बसेस कशा आणि कधीपर्यंत दुरुस्त केल्या जातील, दुरुस्त बसेस केव्हा पासून ठाण्यातील नागरिकांच्या सेवेकरता उपलब्ध होतील,’ असे सवाल करत खंडपीठाने याची संपूर्ण माहिती १८ मार्चपर्यंत घेण्याचे आदेश टीएमटीला दिले.

Web Title: How do you play with your friends?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.