Join us

विसर्जनाची माती कशी मिळणार?, बाप्पाच्या भाविकांना पडला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 1:49 AM

मात्र त्याचीही सोय करण्याचा प्रयत्न पालिकेकडून सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

गौरी टेंबकर - कलगुटकर मुंबई : गणरायाच्या विसर्जनानंतर त्याचा काही भाग पाटावर मातीच्या स्वरूपात घरी आणत त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. बाप्पाला वर्षभर आपल्यासोबत ठेवण्याची ही अनेकांची भावना आहे. मात्र या वेळी कोरोनाच्या संकटामुळे मूर्तींचे ‘एकत्र संकलन’ करण्याची पद्धत अवलंबण्यात येणार असल्याने बाप्पाचा हा अंश आपल्याला कसा उपलब्ध होईल, असा सवाल भाविकांना पडला आहे. मात्र त्याचीही सोय करण्याचा प्रयत्न पालिकेकडून सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.विसर्जनाच्या मूर्ती अपॉइंटमेंट देत एकत्र संकलन करून नंतर त्यांचे विसर्जन पालिका कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.विसर्जनानंतर पाटावर थोडी माती घरी आणून नंतर तिची आरती किंवा पूजा करण्यात येते. मात्र या वेळी विसर्जनाच्या नियमात झालेल्या बदलांमुळे आपल्या मूर्तीचा आशीर्वादरूपी अंश आपल्याला मिळणार नाही, अशी चर्चा सुरू असल्याने भक्तगण काहीसे नाराज झाले आहेत. ही बाब लक्षात घेता तलावातील विसर्जित मूर्तींची एकत्रित माती एका ठिकाणी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त संजोग कबरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गणेशोत्सव हा देशातील सर्वांत मोठ्या उत्सवांपैकी एक असल्याने मूर्तींचे संकलन झाल्यावर त्या केंद्रांतून हलवत नंतर त्यांचे विसर्जन करेपर्यंतचे ‘टास्क’ आमच्यासमोर आहे. धार्मिकतेशी याचा संबंध असल्याने कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत याची काळजी घ्यावी लागणार असून त्यासाठी आम्ही तयार आहोत, हेदेखील कबरे यांनी नमूद केले.>अवघी पृथ्वी होणार गणेशमय!आपण स्वत: जरी गणेशमूर्तीचे विसर्जन केले तरी त्यानंतर आपल्याच मूर्तीची माती आपल्याला मिळणे शक्य नाही. कारण सर्व मूर्तींची माती पाण्यात एकत्र होते. शास्त्रानुसार विचार केला तर संपूर्ण पृथ्वी ही विसर्जनानंतर गणेशमय होते. त्यामुळे पालिकेकडून दिल्या जाणाºया तलावातील मातीलादेखील तितकेच महत्त्व असेल आणि तिचीही त्याच भक्तीभावाने आणि संपूर्ण श्रद्धेसह आपण पूजा, आरती करावी.- पंडित उदय जोशी

टॅग्स :गणेशोत्सव