लोकल बंद असताना कामावर पोहोचणार कसे?; मनसेचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 01:44 AM2020-10-05T01:44:46+5:302020-10-05T01:45:25+5:30
विविध आस्थापना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेत आहे. मात्र, या कामाच्या ठिकाणी कर्मचारी पोहोचणार कसे, याचा विचार राज्य सरकारने केला आहे का, असा प्रश्न देशपांडे यांनी केला.
मुंबई : ‘पुन:श्च हरिओम’अंतर्गत विविध आस्थापना सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोमवारपासून हॉटेल्स, फूड कोर्ट आणि बारही ५० टक्के क्षमतेने सुरू होत आहेत. मात्र, लोकल बंद असल्याने या आस्थापनातील कामगार कामाच्या ठिकाणी पोहोचणार कसे, असा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.
विविध आस्थापना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेत आहे. मात्र, या कामाच्या ठिकाणी कर्मचारी पोहोचणार कसे, याचा विचार राज्य सरकारने केला आहे का, असा प्रश्न देशपांडे यांनी केला. सध्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी आणि तिथून घरी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तासन् तास बसची वाट पाहावी लागते. बराच वेळ वाया जातो. स्वत: न्यायालयानेही याप्रकरणी सरकारला विचार करा, असा सल्ला दिला.
‘लोकल सुरू करा’
सरकार विचारच करत नाही. स्वत: घरी बसून लोकांनाही घरी बसण्याचे सल्ले दिले जात आहेत, असा टोला लगावत लवकरात लवकर लोकल सेवा सुरू करण्याची मागणी देशपांडे यांनी केली. घरी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.