मुंबई : बेस्टला एकिकडे निधीची चणचण जाणवत असतानाच दिवसेंदिवस प्रवासी संख्याही कमी होऊ लागली आहे. दररोज बेस्टने प्रवास करणाऱ्यांची संख्या सरासरी २५ लाखांवर आली आहे़ हेच प्रमाण २००९मध्ये ४५ लाख प्रवासी एवढे होते. प्रवासी संख्या घटल्याचा स्वाभाविक फटका बेस्टच्या उत्पन्नालाही बसला आहे.
बेस्टच्या तोट्यात दररोज भर पडच असून एसी बस ताफ्यात ठेवण्याचा खर्च डोईजड झाल्याने त्या २८४ बसगाड्या २०१७मध्ये ताफ्यातून बाहेर काढण्यात आल्या. मुंबई शेजारील बहुतांश महापालिकांमधील परिवहन सेवा एसी बसेस चालवत असताना चुकीच्या नियोजनामुळे बेस्टच्या एसी बसेस बंद आहेत.महापालिकेने दिले बेस्ट वाचवण्यासाठी उपायबेस्ट उपक्रमास वाचवण्यासाठी गेल्या वर्षी पालिकेने पुनरूज्जीवन आराखडा तयार केला होता. त्यात काही उपाय सुचविले होते. त्यातील कशाचीच अमलबजावणी न झाल्याने आयुक्तांनी बेस्टसाठी जादा तरतूद करण्यास नकार दिला. काय होते ते उपायमहापालिकेने दिले अवघे ३४ कोटीतिकिटांचे वाढलेले दर, वाहतूक कोंडीत मोडणारा वेळ, बसला होणारा उशीर, मार्ग बंद करणे आदी गोष्टींमुळे बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या कमी होऊ लागली आहे. बेस्टला एक किलोमीटरची फेरी चालविण्यास दहा वर्षांंपूर्वी ५५ रुपये खर्च यायचा तो आता अंदाजे १०९ रुपयांच्या घरात गेला आहे. या पार्श्वभूमीवर बेस्टला महापालिकेकडून चांगली मदत मिळेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात आयुक्त अजोय मेहता यांनी ३४ कोटी रुपयांची तरतूद केली.उत्पन्नही घटलेअनंत अडचणी असतानाही २०१६मध्ये बेस्टचे दैनंदिन उत्पन्न ३.७ कोटींच्या घरात गेले होते. ते आता पुन्हा २०११-१२च्या पातळीवर म्हणजेच सरासरी २.८ कोटीं रुपयांवर आले आहेना नफा, ना तोटा या तत्त्वावर बेस्ट धावते आहे. बेस्टला मदत मिळावी म्हणून आम्ही सरकार आणि महापालिका अशा दोघांकडे मदत मागितली. त्यांनी पुरेशी मदत केलेली नाही. बेस्टला तोटयातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी मदत करणे अपेक्षित आहे. दुसरे असे की, आजघडीला जग धावते आहे. मुंबईकरांना वेळेत ठिकठिकाणी पोहचायचे असते. मुंबईत सुरु असलेल्या विविध कामांमुळे बसच्या फेºयांवर परिणाम होतो आहे. वेळ वाया जात असल्याने मुंबईकर बेस्टकडे फिरकत नाही. बेस्ट प्रशासनाला तोटयातून बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.- आशिष चेंबूरकर, अध्यक्ष, बेस्ट समितीबेस्टचा प्रवास बंद होता कामा नये. बेस्टची थोडी फार भाडेवाढ झाली, तरीही बेस्टही सर्व साधारण व्यक्तीसाठी बेस्ट वाहतूक साधन आहे. सध्या लोकांकडे गाड्या आल्या आहेत. वाढणारी वाहतूक, विकास कामांमुळे बेस्टला उशीर होतो. त्यामुळे बेस्टमधून प्रवास करणे नागरिक टाळतात.- वैभव महाडिक, प्रवासीकाही वर्षांपासून बेस्टची अवस्था गंभीर झाली आहे. पहिल्यांदा टाटा कंपनीच्या बस गाड्या होत्या. त्यानंतर ज्या गाड्या घेतल्या आहेत, त्या बहुतेक गाड्या भंगारामध्ये गेल्या आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी बेस्टचा ९ दिवस संप होता. त्यावेळी बेस्टला दररोज ३ कोटीचे नुकसान झाले. तर याचा लेखाजोखा घेतला तर तीन कोटी रुपयांत बेस्ट व्यवस्थित चालायला पाहिजे.- बाळाजी नाईक, प्रवासी