Join us

सद्य:परिस्थितीत आपले वित्त व्यवस्थापन कसे करावे; एक गुंतवणूकदार प्रशिक्षण वेबिनार आज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 11:35 PM

आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंड आणि लोकमत संयुक्त विद्यमाने आयोजन; तज्ज्ञांचे मार्गदर्शन

मुंबई : आपण गुंतवणूक करण्याच्या विचारात आहात. माहितीच्या जाळामुळे गुंतवणूक कुठे करावी याविषयी आपल्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मग, जरा थांबा... कारण आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंड आणि लोकमत संयुक्त विद्यमाने आयोजन यांच्या संयुक्त विद्यमाने २० जून रोजी स्मार्ट इन्व्हेस्टर सद्य परिस्थिती आपले वित्त व्यवस्थापन कसे करावे आणि म्युच्युअल फंड' या विषयावरील वेबिनार आयोजित केला आहे. वेबिनारमध्ये तज्ज्ञाचे मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.गुंतवणूक कुठे करावी याविषयी तुमच्या समोर असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे कोणता पर्याय सर्वोत्तम आहे, हे निवडणे कठीण जात आहे. जर आपला निर्णय चुकला की भविष्यातील आपले लक्ष्य स्वप्नवत ठरू शकते. यामुळे तुम्ही चिंतेत आहात. यासाठी गुंतवणूक क्षेत्रात दीर्घ अनुभव असलेल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची आपणास गरज आहे. याचा विचार करूनच आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंड आणि लोकमत यांनी वेबिनारचे आयोजन केले आहे. यात तुम्हाला गुंतवणुकीविषयी पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. तुमचे स्वप्न काय आहे, तुम्ही जीवनात काय लक्ष्य ठेवले आहे किंवा तुमच्या भविष्यातील प्राथमिकता कशा ठरवायच्या याविषयी माहिती देण्यात येणार आहे. तसेच म्युच्युअल फंड म्हणजे काय, त्याद्वारे कुठेकुठे कशी गुंतवणूक केली जाते. वेबिनार सायंकाळी ५. ३० वाजता होणार आहे. अधिक माहितीसाठी ९८७०९१२२३३ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.तज्ज्ञांचे लाभणार मार्गदर्शन‘स्मार्ट इन्व्हेस्टर सद्य:परिस्थिती आपले वित्त व्यवस्थापन कसे करावे,’ या विषयावरील वेबिनारसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यात वक्ते म्हणून आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडचे गौरव जाजू व अर्थतज्ञ एनएसडीएलचे उपाध्यक्ष चंद्रशेखर टिळक हे बहुमूल्य मार्गदर्शन करणार आहेत.ही संधी सोडू नका...शनिवार, दि. २० जून,सायंकाळी ५.३० वाजताखालील लिंकवर त्वरित नोंदणी कराhttps://bit.ly/ICICIPRUMFWEBINAR

टॅग्स :गुंतवणूक