लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ३०३ पैकी ४३ जागा १ लाखाहून अधिक मतांच्या फरकाने जिंकल्या, त्यापैकी १८ जागा महाराष्ट्रातून जिंकल्या होत्या. राज्यात पक्षाने विजयाचे मताधिक्य मिळविताना सरासरी १.८ लाख अधिक मते मिळविली होती.
महाराष्ट्रात सर्वाधिक मार्जिन कुणाला? ४ उमेदवारांनी ४ लाखांपेक्षा अधिक मते मिळविली होती. मुंबई उत्तरचे भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी सर्वाधिक ३.६ लाख मते मिळविली होती. उद्धवसेनेच्या राजन विचारे यांना ठाण्यात ४.१ लाखांहून अधिक मते मिळाली होती. तर जळगावमध्ये भाजपचे उन्मेष पाटील यांनीही ४.१ लाखांहून अधिक मते मिळविली होती.
३ लाखांपेक्षा अंतर३ उमेदवारांना ३ लाखांहून अधिक मते मिळाली होती. शिंदेसेनेने कल्याणमध्ये तर भाजपने रावेर, जालना आणि पुण्यात ३ लाखांहून अधिक मते मिळवली होती. तर १ लाखांहून अधिक मतांच्या फरकाने केवळ शरद पवार गटाने बारामतीत आणि सातारा येथे विजय मिळविला होता.
राज्य कमाल मताधिक्य किमान मताधिक्य सरासरी (लाखमध्ये) हिमाचल ४नवी दिल्ली ३.९हरयाणा ३.६राजस्थान ३.४गुजरात ३.४मध्य प्रदेश ३.०उत्तराखंड २.९तामिळनाडू २.५झारखंड २.५बिहार २.२महाराष्ट्र १.८आसाम १.८कर्नाटक १.७उत्तर प्रदेश १.६पश्चिम बंगाल १.४छत्तीसगड १.३जम्मू काश्मीर १.३आंध्र प्रदेश १.२ केरळ १.२तेलंगणा १.२पंजाब ०.९ओडिशा ०.८