आपल्या महापालिकेत आता किती नगरसेवक असतील?... जाणून घ्या नवी सदस्यसंख्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 08:45 PM2021-10-27T20:45:10+5:302021-10-27T20:57:00+5:30
महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईकरांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान ६५ सदस्य व कमाल १७५ इतकी आहे. तर नगरपरिषदांमधील सदस्य संख्या किमान १७ सदस्य व कमाल ६५ इतकी आहे. महानगरांमधील व लहान नागरी क्षेत्रांमध्ये झालेले रचनात्मक परिवर्तन व नागरी समस्यांची उकल व विकास योजनांचा वेग वाढविणे यासाठी सर्व कार्यक्षेत्राला योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने सदस्य संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.
२०११च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर महानगरपालिका व नगरपरिषदांमधील सदस्य संख्या निर्धारित आहे. कोवीड-19 च्या प्रार्दुभावामुळे २०२१ च्या जनगणनेचे निष्कर्ष अप्राप्त आहेत. त्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. या कालावधीत लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहीत धरुन अधिनियमात नमुद केलेल्या महानगरपालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत १७ टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले :@mieknathshindepic.twitter.com/zPb2X5hzSO
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 27, 2021
महानगरपालिकेचे नाव सद्याची सदस्य संख्या सुधारणेनंतर प्रस्तावीत सदस्य संख्या
परभणी ६५ ७६
चंद्रपूर ६६ ७७
अहमदनगर ६८ ७९
लातूर ७० ८१
धुळे ७४ ८५
जळगाव ७५ ८६
सांगली-मिरज-कुपवाड ७८ ८९
उल्हासनगर ७८ ८९
पनवेल ७८ ८९
अकोला ८० ९१
कोल्हापूर ८१ ९२
नांदेड-वाघाळा ८१ ९२
मालेगाव ८४ ९५
अमरावती ८७ ९८
भिवंडी-निजामपूर ९० १०१
मिरा-भाईंदर ९५ १०६
सोलापूर १०२ ११३
नवी मुंबई १११ १२२
औरंगाबाद ११५ १२६
वसई-विरार ११५ १२६
नाशिक १२२ १३३
कल्याण-डोंबिवली १२२ १३३
पिंपरी-चिंचवड १२८ १३९
ठाणे १३१ १४२
नागपूर १५१ १५६
पुणे १६२ १७३
मुंबई- राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. pic.twitter.com/p1RzOnN3dt
— Lokmat (@lokmat) October 27, 2021