शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा? जागावाटपाबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 09:07 PM2023-04-13T21:07:27+5:302023-04-13T21:34:01+5:30

चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला ५० जागा देण्यासंदर्भात भाषण दिल्यानंतर शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता.

How many seats for Shinde's Shiv Sena? Devendra Fadnavis said clearly about seat allocation | शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा? जागावाटपाबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा? जागावाटपाबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

googlenewsNext

मुंबई- राज्यातील शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंसोबत शिवसेनेचे ४० आमदार भाजपसोबत आहेत. त्यामुळे, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाही भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, शिवसेनेला किती जागा देण्यात येतील, याबद्दल अद्याप स्पष्ट झालेलं नाही. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनीही याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय होईल, असे म्हटले होते. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला ५० जागा देण्यासंदर्भात भाषण दिल्यानंतर शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. शिवसेना नेत्यांनी तो बावनकुळेंच्या अधिपत्याखालील विषयच नसल्याची टीका केली. जागावाटपाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेते ठरवतील, असा सूरही यावेळी शिवसेनेकडून निघाला होता. तर, भाजपने हा विषय जागेवरच थांबवण्याचा प्रयत्न केला. आता, देवेंद्र फडणवीस यांनीही या जागावाटपाबाबत आणि पुढील निवडणुकांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

बावनकुळे यांनी जे म्हटलं होतं, ते कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्यासाठी म्हटलं होतं. तो एक लहानसा कार्यक्रम होता, त्यांनाही माहिती नव्हत की तिथ कॅमेरा लागला आहे. अलिडकच्या काळात कुणीही शुटींग करत असते, असे म्हणत फडणवीस यांनी बावनकुळेंची पाठराखण केलीय.  

२०२४ साठी भाजप-शिवसेना-रिपाइं आणि आमचे सर्वच मित्र पक्ष एकत्र लढतील. जागावाटपाचा जो मुद्दा आहे तेही व्यवस्थित होईल. शिवसेनेला योग्य जागा दिल्या जातील, त्यावरुन कुठलाही वाद होणार नाही, ते १०० टक्के फेअर डिस्ट्रीब्युशन असेल, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाबाबत स्पष्टीकरण दिलं. तसेच, २०२४ मध्येही पुन्हा शिवसेना-भाजपचंच सरकार निवडून येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

काय म्हणाले होते अमित शहा

एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. निवडणूक आयोगानेही त्यांनाच धनुष्य-बाण हे चिन्ह दिलंय. दोन्ही पक्षांची युती असून आगामी निवडणुकाही भाजप आणि शिवसेना यांच्यातच होतील, असे अमित शहांनी स्पष्ट केलं. तसेच, महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप यांच्यातील जागावाटपाबाबत दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवू, हा मोठा विषय नाही. गजर पडली तर तुम्हालाही बोलवू असा मिश्किल टोलाही अमित शहा यांनी पत्रकाराला लगावला होता.
 

Web Title: How many seats for Shinde's Shiv Sena? Devendra Fadnavis said clearly about seat allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.