Join us  

सुप्रिया सुळेंविरोधात नामदेवराव जाधवांना, अन् बिचुकलेंना कल्याण, साताऱ्यात किती मते मिळाली? आकडा पाहून काय म्हणाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 4:26 PM

Maharashtra lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या लोकसभेलाही सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारे अभिजीत बिचुकले यांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे.

Maharashtra lok Sabha Election Result ( Marathi News ) : देशभारत गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल अखेर आले आहेत. गेल्या काही दिवसापासून देशभरात प्रचारसभा सुरू होत्या. आता पुन्हा एकदा एनडीए'चे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाले आहे. या लोकसभा निवडणुका चुरशीने झाल्या. एक्झिट पोलने दिलेल्या अंदाजाच्या विरुद्ध निकाल लागले आहे. राज्यातील बारामती, सातारा या मतदारसंघाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होती, तर साताऱ्यात छत्रपती उदयनराजे विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत होती. तर दुसरीकडे या मतदारसंघात सोशल मीडियावर प्रसिद्ध असणार अभिजीत बिचुकलेही मैदानात होते. 

 

आशिष शेलारांचा यु-टर्न, आधी म्हणाले राजकारण सोडणार, आता म्हणाले, "आधी उद्धव ठाकरेंनी राजकीय ..."

तर बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात मोटिव्हेशनल स्पिकर्स म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेवराव जाधव यांनीही निवडणूक लढवली होती. जाधव यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध विषयावर प्रचार केला होता. जाधव यांना सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर मोठा फॉलो करणारा वर्ग आहे. दरम्यान, ४ जून रोजी बारामती लोकसभा मतदारसंघातील निकाल समोर आले असून, खासदार सुप्रिया सुळे १ लाख ५८ हजार ३३३ मताधिक्क्याने विजयी झाल्या आहे. सुळे यांना एकुण ७ लाख ३२ हजार ३१२ एवढी मते मिळाली आहेत, तर सुनेत्रा पवार यांना ५ लाख ७३ हजार ९७९ एवढी मते मिळाली आहेत. दरम्यान, नामदेवराव जाधव यांना २१३४ एवढी मते मिळाली आहेत.

अभिजीत बिचुकलेंना किती मते मिळाली?

अभिजीत बिचुकले हे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. ते प्रत्येक निवडणूक लढवतात. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील कसब्यातील निवडणूकही त्यांनी लढवली होती. दरम्यान, आता बिचुकले यांनी सातारा लोकसभा आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली. ४ जून रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार, अभिजीत बिचुकले यांना सातारा लोकसभा मतदारसंघात  १३९५ एवढी मते मिळाली आहेत, तर कल्याण लोकसभा मतदारसंघात १८२४ एवढी मते मिळाली आहेत. 

सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले ३२ हजार ७७१ एवढ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत,त्यांना एकुण मतदान ५७११३४ एवढी मते मिळाली आहेत. तर त्यांच्याविरोधात 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाच्या शशिकांत शिंदे यांना ५३८३६३ एवढी मते मिळाली आहेत. तर कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांचा विजय झाला आहे, त्यांना ५८९६३६ एवढी मते मिळाली आहेत, तर त्यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वैशाली दरेकर यांना ३८०४९२ एवढी मते मिळाली आहेत. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४अभिजीत बिचुकलेलोकसभा निवडणूक २०२४ निकाल