डोंबिवली MIDC मधून शिंदे सेनेचे लोक...; संजय राऊत यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 02:09 PM2024-06-12T14:09:01+5:302024-06-12T14:11:21+5:30

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीला लागलेल्या आगीसंदर्भात विचारले असता, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप केला आहे...

How much dues do Shinde Sena people collect from Dobivali MIDC check this Direct accusation of Sanjay Raut on Eknath shinde | डोंबिवली MIDC मधून शिंदे सेनेचे लोक...; संजय राऊत यांचा हल्लाबोल

डोंबिवली MIDC मधून शिंदे सेनेचे लोक...; संजय राऊत यांचा हल्लाबोल

डोंबिवली एमआयडीसीमधील इंडो अमाईन आणि अन्य एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. कंपनीत स्फोट झाला आणि आगीची घटना घडली, अशी माहिती आहे. येथील अभिनव शाळेजवळ ही घटना घडल्याने शाळेतील विद्यार्थी आणि परीसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या महिन्यातच येथील अंबर केमिकल कंपनीत रिएक्टरचा स्फोट झाला होता. यानंतर आज पुन्हा येथील कंपनीला आग लागल्याची घटना घडली. यासंदर्भात बोलताना, डोबिवली एमआयडीसीतून शिंदे सेनेचे लोक किती हप्ते गोळा करतात? त्याचे आकडे आता द्यावे लागतील, असे म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर थेट आरोप केला आहे. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.

पत्रकार परिषदेदरम्यान, डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीला लागलेल्या आगीसंदर्भात विचारले असता, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप केला आहे. "डोबिवली एमआयडीसीतून शिंदे सेनेचे लोक किती हप्ते गोळा करतात? त्याचे आकडे आता द्यावे लागतील. किती बेकायदेशीर कामे सुरू आहेत? पोलिसांपासून शिंदे सेनेच्या लोकांपर्यंत लाख्खो कोट्यवधींचे हप्ते कसे जातात? हे एकदा तुम्ही तपासून बघा."

अमित शाह यांच्यावरही थेट आरोप -
“नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचा उत्सव सुरू असतानाच वैष्णव देवीला जाणाऱ्या भाविकांच्या एका बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात ११ लोकांचा मृत्यू झाला. तर ३० लोक जखमी आहे. त्यानंतर सातत्याने जम्मूमध्ये हल्ले सुरु आहेत. आजही बातमी आली आहे की, सीआरपीएफच्या जवानांच्या काफिल्यावर हल्ला झाला. ३७० कलम रद्द केल्याचा डंका अमित शाह वाजवत आहेत. मात्र, तेव्हापासून काश्मीरत शांतता नांदलेली नाही. काश्मिरी पंडित त्यांच्या घरी जाऊ शकलेले नाहीत, हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे. विशेष म्हणजे, आता अमित शाह यांना पुन्हा एकदा गृहमंत्रीपद दिल्यानंतर जम्मू काश्मीर आणि मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार सुरू झाला आहे.” असे म्हणत संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावरही थेट निशाणा साधला आहे.
 

Web Title: How much dues do Shinde Sena people collect from Dobivali MIDC check this Direct accusation of Sanjay Raut on Eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.