कापसाला किती भाव?; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जाणून घ्या बाजारभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 01:12 PM2023-11-04T13:12:43+5:302023-11-04T13:13:10+5:30
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य बाजारभाव काय असतील, याची शेतकऱ्यांना काळजी आहे.
मुंबई : हवामानाच्या बदलामुळे यंदा कापसाचे मोठे नुकसान होऊन ३० ते ३५ टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य बाजारभाव काय असतील, याची शेतकऱ्यांना काळजी आहे.
उत्पादनाचा अंदाज
nगेल्या वर्षी १४ वर्षांमधील नीचांकी उत्पादनानंतर, भारतातील कापूस पीक ३३७ लाख गाठी म्हणजे गेल्या वर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेत २६ लाख गाठींनी जास्त असल्याचा अंदाज आहे.
n२०२३-२४ मध्ये जागतिक कापूस उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत किरकोळ वाढण्याची अपेक्षा आहे (०.५ टक्का किंवा ६ लाख गाठी) ते ११५.० दशलक्ष गाठी. अमेरिकेत जास्त उत्पादनाची अपेक्षा तसेच चीन, तुर्कस्तान आणि पाकिस्तानमध्ये कमी उत्पादनाचा अंदाज आहे.
७,००० ते ८,०००
जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीसाठी कापसाच्या किमती अंदाजे रु. ७,००० ते ८,००० प्रति क्विंटल राहतील असा अंदाज पुणे येथील कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष यांनी वर्तविला आहे.
आयात-निर्यात
nएकूण जागतिक कापूस उत्पादनापैकी २५ टक्के वाट भारताचा आहे.
nराष्ट्रीय आयात आणि निर्यातीच्या बाबतीत मागील वर्षाच्या तुलनेत २०२२-२३ मध्ये आयातीत ५५ टक्के वाढ आणि निर्यातीत २३ टक्के घट होण्याचा अंदाज होता.
nहाच कल जागतिक पातळीवर दिसला असून, मागील वर्षीच्या तुलनेत आयातीत ३.८४ टक्के वाढ आणि निर्यातीत १.८१ टक्के घट झाली.
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारी, त्यांच्या मदतीसाठी तत्पर असणारी आणि बळीराजाला ‘राजा’ मानणारी त्यांच्या हक्काची वेबसाइट www.lokmatagro.com
नक्की भेट द्या!