डाळ आणि पाण्यावर आम्ही आणखी किती काळ जगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 04:12 PM2020-09-20T16:12:04+5:302020-09-20T16:12:32+5:30

मुंबई महानगर प्रदेशातील शहरी गरिबांवर कोरोनाचा प्रभाव या अहवालातून अनेक निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

How much longer will we live on dal and water? | डाळ आणि पाण्यावर आम्ही आणखी किती काळ जगणार

डाळ आणि पाण्यावर आम्ही आणखी किती काळ जगणार

Next


मुंबई : दुध किंवा त्यासारखे अतिरिक्त अन्नपदार्थ विकत घेणे आमच्यासारख्या कुटूंबासाठी अश्यक आहे. केवळ डाळ आणि पाण्यावर आम्ही आणखी किती काळ तग धरणार? अशी खंत नवी मुंबईतल्या तुर्भे येथील झोपड्यांत वास्तव्यास असलेल्या जुही या मुलीने व्यक्त केली आहे. जुही हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण आहे. जुहीसारख्या कित्येक मुली-मुले आज जगण्यासाठी धडपडत आहे. आणि हे जगण्याचे भयान वास्तव युवा संस्थेने मांडले आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील शहरी गरिबांवर कोरोनाचा प्रभाव या अहवालातून अनेक निष्कर्ष काढण्यात आले आहेत. सदर अहवाल तयार करताना युवा संस्थेने १० शहरांमधील ३९ हजार ५६२ जणांशी संवाद साधला आहे. यात काही बांधकाम क्षेत्रात काम करत असलेल्या कामगारांचादेखील समावेश आहे. स्थलांतरित प्रवाशांचाही समावेश आहे. यातील काहींच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत, असे युवा संस्थेचे वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक नामदेव गुलदगड यांनी सांगितले.  

आम्हाला कोरोनाची भीती वाटते. पण त्यापेक्षाही आम्ही उपाशी मरु याची भीती आम्हाला अधिक वाटते, असे मुंबईच्या पूर्व उपनगरात राहणा-या आणि घरकाम करणा-या वैशाली यांना वाटते. तर वडाळा येथील झोपड्यांत राहणा-या शाजी या अपंग व्यक्तीच्या म्हणण्यानुसार त्याच्याकडे होती नव्हती ती बचतदेखील आता संपली आहे. हे असेच सुरु राहिले कोणाकडे पैसे शिल्ल्क राहतील, असा सवालही शाजी करतात.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात वांद्रे येथील वास्तव्यास असलेली आणि गृहउद्योगातील कामगार शायमा यांच्या म्हणण्यानुसार, माझे पती रोजंदारीवर काम करतात. त्यामुळे दिवसभर मिळणा-या पैशावर आमचे घर चालते. माटुंगा येथे बेघर असलेल्या नसरीन यांच्यावर अगदी वाईट वेळ आली आहे. घरकाम करत असलेल्या नसरिन यांना कामावर जाता आलेले नाही. त्यांना वेतन मिळालेले नाही. आता पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. माझी मुले भिक मागत आहेत. त्यातून आम्हाला काही पैसे आणि अन्न मिळते, असे त्या सांगतात. मी भंगार आणि कचरा वेचून पैसे कमविण्याचा प्रयत्न करते.

बेघर असलेल्या ऋषभ बेकार सफाई कामगार आहे. त्याने दैनंदिन वापरासाठी कर्ज काढून पैसे उभे केले. यातील अधिक रक्कम पाणी आणि प्रसाधनगृहावर खर्च होते. जोगेश्वरी येथील झोपड्यांत राहणा-या शीला यांच्या म्हणण्यानुसार, या गोष्टी अशा आणखी किती दिवस सुर राहणार आहेत ते माहित नाही. व्यवसाय नाही. बाकी काहीच चालू नाही. आम्ही जगणारे कसे. आम्ही पैसे कुठून आणणार. आम्ही कशाच्या जोरावर पोट भरणार. आम्हाला असेच जगावे लागले तर आमच्याकडे काहीच शिल्लक राहणार नाही.

Web Title: How much longer will we live on dal and water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.