Join us

किती पाण्याची वाफ होते? मुंबई महापालिकेला पत्ताच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2023 11:43 AM

धरण-तलावातील पातळी पाहून व्यक्त करतात अंदाज

रतींद्र नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईकरांची तहान तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तुळशी, विहार व भातसा या तलावांद्वारे भागविली जाते. वाढता उन्हाळा पाहता मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या या तलावांतून किती पाण्याचे बाष्पीभवन होते, याचे प्रमाण मोजणारे यंत्रच नसल्याची माहिती समोर आली आहे. केवळ पाण्याचा दैनंदिन  उपसा व पातळीवरून किती घट झाली, याची नोंद केली जात असून, दररोज पाण्याचे किती बाष्पीभवन होऊन उडून गेले, त्याची नेमकी माहिती पालिकेलाही नाही.

सात तलावांतून मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. यातील तुळशी व विहार ही धरणे सोडली तर इतर धरणे ही मुंबईपासून सुमारे १४० किलोमीटर अंतरावर आहेत. वाढत्या उन्हाळ्यामुळे या धरणांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. या तलावांतील अनेक लिटर पाणी बाष्पीभवनाद्वारे हवेत विरून जाते. पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण नेमके किती हे तपासण्यासाठी राज्यातील काही तलाव क्षेत्र, धरणांजवळ बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्यात आले आहे तर त्यातील काही यंत्र नादुरुस्त आहेत.

तलावांमध्ये किती साठा? (दशलक्ष लिटर)

इव्हॅपुरेशन मीटर- तलाव किंवा धरणाच्या आडोशाला, मोकळ्या जागेत जेथे सावली येणार नाही, प्राण्यांचा किंवा अन्य उपद्रव होणार नाही, अशा ठिकाणी हे पॅन इव्हॅपुरेशन मीटर बसविले जाते.

पाण्याच्या नियमित उपसा व त्याची पातळी मोजली जाते. पाण्याचे बाष्पीभवन किती प्रमाणात होते, किती प्रमाणात पाणी उडून जाते, त्याचे मापन केले जात नाही. -पुरुषोत्तम माळवदे, जल अभियंता, पालिका

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिकापाणी