Join us

अटल सेतूवर किती लागणार टोल, बंद पडलेल्या वाहनांचं काय होणार?

By सचिन लुंगसे | Published: January 12, 2024 5:41 PM

अटल सेतूसाठी जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन मार्गिका आहेत.

मुंबई : मुंबईतील शिवडी आणि नवी मुंबईतील न्हावा-शेवा या दोन ठिकाणांना जोडणारा अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या उद्घाटनानंतर वाहतूकीसाठी खुला झाला असून, ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतच्या टोलदरानुसार येथून प्रवास करणा-या वाहन चालकांना २५० रुपयांपासून १५८० रुपये सिंगल प्रवासासाठी मोजावे लागणार आहेत.अटल सेतूसाठी जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन मार्गिका आहेत. पूर्व द्रुतगती मुक्तमार्ग हा सेतूला जोडला गेला आहे आणि पूर्व-पश्चिम असणारा वरळी-शिवडी उन्नतमार्ग हा भविष्यात अटल सेतू प्रकल्पास जोडला जाणार आहे. यामुळे मुंबई सागरी किनारा रस्त्याद्वारे (कोस्टल रोड) दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांना अटल सेतूद्वारे विनाथांबा प्रवास करणे शक्य होईल.पुलाच्या दुसऱ्या बाजूला, नवी मुंबईतील उलवे येथील शिवाजीनगर, उरण-पनवेल राज्य महामार्ग आणि मल्टीमॉडेल कॉरिडॉरवर चिर्ले येथे आंतरबदल (इंटरचेंज) आहेत. याद्वारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण, पुणे किंवा गोवा येथून प्रवासी जड वाहने सहजतेने मुंबईत प्रवेश करू शकतील. हा सेतू मार्ग विविध जोडरस्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जाणार असल्याने यामधील अंतर कमी होणार आहे. या प्रकल्पामध्ये भारतातील पहिल्या ओपन रोड टोलिंग प्रणालीचा देखील वापर करण्यात आला आहे.१३ जानेवारी ते ३१ डिसेंबरपर्यंतचा टोल दरवाहने / सिंगल जर्नी / रिटर्न जर्नी / डेली पास / मंथली पासकार / २५० / ३७५ / ६२५ / १२५००एलसीव्ही / मिनी बस / ४०० / ६०० / १००० / २००००बस/२-अ‍ॅक्सेल ट्रक / ८३० / १२४५ / २०७५ / ४१५००एमएव्ही (थ्री अ‍ॅक्सेल) / ९०५ / १३६० / २२६५ / ४५२५०एमएव्ही ( ४ टू ६ अ‍ॅक्सेल) १३०० / १९५० / ३२५० / ६५०००ओव्हरसीझ / १५८० / २३७० / ३९५० / ७९०००

किती लोकांनी काम केले ?प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी तीन स्थापत्य कंत्राटदार, एक इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्ट सिस्टिम कंत्राटदार, विविध १० देशांतील विषयतज्ज्ञांनी योगदान दिले आहे. तर १५०० हून अधिक अभियंते, तर सुमारे १६ हजार ५०० कुशल मजुरांनी तीन पाळ्यांमध्ये अहोरात्र काम केले आहे.

बंद पडलेल्या वाहनांचे काय होणार?सुरक्षेची बाब लक्षात घेऊन बंद पडलेली वाहने नेण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन मार्गिका, ॲण्टी-क्रॅश बॅरियर्स असलेली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिम, पक्ष्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये ध्वनी अडथळे (साऊंड बॅरिअर्स) लावण्यात आले आहेत. 

टॅग्स :शिवडी - न्हावा शेवा अटल सेतू