Join us

दहावी बारावी परीक्षादरम्यान शिक्षक पर्यवेक्षक चाचण्या किती वेळा करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:06 AM

आरटीपीसीआर चाचण्या ४८ तास वैद्य असल्याने शाळा, संस्थाचालक, शिक्षकांत संभ्रमस्थानिक प्रशासनाकडून मिळणाऱ्या सुविधांवर ही अद्याप प्रश्नचिन्हचलोकमत न्यूज ...

आरटीपीसीआर चाचण्या ४८ तास वैद्य असल्याने शाळा, संस्थाचालक, शिक्षकांत संभ्रम

स्थानिक प्रशासनाकडून मिळणाऱ्या सुविधांवर ही अद्याप प्रश्नचिन्हच

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

कोरोनाला आला घालण्यासाठी राज्य शासनाने जारी केलेल्या नियमावलीत ‘ब्रेक द चैन’च्या निमित्तानी नेक निर्बंध लागू केले असून पुन्हा एकदा शाळा महाविद्यालये, खासगी कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान दहावी-बारावीच्या परीक्षांना यातून वगळले असले तरी शाळा पातळीवर शिक्षकांनाही काही निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने इ. १० व इ. १२ वीच्या परीक्षेच्यावेळी उपस्थित राहताना आरटी पीसीआर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र हे प्रमाणपत्र फक्त ४८ तासच वैद्य असल्याने परीक्षेसाठी कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पर्यवेक्षक यांनी ही चाचणी दर २ दिवसांनी करावी, असे शासनाला वाटते का असा प्रश्न शिक्षक उपस्थित करत आहेत. त्याऐवजी विद्यार्थ्यांसोबत सर्व वयोगटातील शिक्षकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी. अशी मागणी शिक्षकांसोबतच पालकवर्गाकडून करण्यात येत आहे.

परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची कोविडची लक्षणे ओळखून, लक्षणे आढळणाऱ्या विद्यार्थ्याला स्वतंत्र खोलीत बसवण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. मात्र कोविडची लक्षणे शिक्षक कसे ओळखणार? त्यांना यंत्रणा उपलब्ध करून देणार का? सर्व शिक्षकांना त्याचे प्रशिक्षण नाही मग अशात काय करणार असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित आहेत. त्यातच विनातपास विद्यार्थ्यांना कोविडची लक्षणे आहेत, म्हणून त्यांना स्वतंत्र बसवून परीक्षा देताना त्यांच्या मानसिकतेचा विचार होणे आवश्यक आहे. तसेच यावेळी शिक्षक व पालक यांच्यातही वाद होऊ शकतो. याकरिता शासनानेच आरटी पीसीआर चाचणीची व्यवस्था करावी, याकरिता वैद्यकीय पथक नेमण्यात यावे, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे. शिक्षक परिषदेने सर्व शिक्षकांना लस देण्याची मागणी यापूर्वी वारंवार मागणी केली होती. आतापर्यंत सर्व शिक्षकांचा दुसरा डोस घेऊन पूर्ण झाला असता. त्यामुळे कदाचित परीक्षेवेळी हजर रहाताना कोरोनाची भीती राहिली नसती. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले असेच म्हणावे लागेल असा आरोप केला त्यांनी केला आहे.

या आधी ऑनलाईन शिक्षणाबरोबरच घरोघरी जाऊन तपास करणे, कोविडयोद्धा म्हणून काम पाहिले आहे. यावेळी अनेकांना कोविडची लागण झालेली आहे,ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे, अशा शिक्षकांना नजीकच्या काळात कोरोना प्रतिबंधात्मक लस देता येत नसल्याचे समजते. त्यामुळे अशा शिक्षकांना लस देता येणार नाही. त्यामुळे त्यांना परीक्षेच्या कामकाजातून वगळण्यात यावे. याचसोबत काही वैद्यकीय कारणांमुळे लस घेणे शक्य नसल्यास त्यांनाही प्रत्यक्ष परीक्षेचे काम देऊ नये, अशी मागणी ही शिक्षक वर्गातून होत आहे.

बाकी परीक्षांच्या कामात असणाऱ्या शिक्षकांना परीक्षाआधी लस द्यावी, तसेच स्थानिक प्रशासनाकडून सर्व सोयी सुविधा आधीच उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्या शाळा व संस्थाचालकांकडून शासनाकडे होत आहेत.