Join us  

घरखर्च भागवायचा कसा?

By admin | Published: March 01, 2016 3:00 AM

घरचे बजेट सांभाळण्यात गृहिणींचा हातखंडा असतो. महागाईची झळ सोसत, सतत काटकसर करत गृहिणी घरचे बजेट सांभाळतात

मुंबई : घरचे बजेट सांभाळण्यात गृहिणींचा हातखंडा असतो. महागाईची झळ सोसत, सतत काटकसर करत गृहिणी घरचे बजेट सांभाळतात. परंतु, सोमवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात सेवाकर, चप्पल आणि ब्रॅण्डेड कपडे यांचे दर वाढणार असल्याने आता गृहिणींची तारांबळ उडणार आहे. ‘अच्छे दिन’च्या आशेत असलेल्या गृहिणींनी अर्थसंकल्पाविषयी नाराजी व्यक्त करत आता बजेटचा डोलारा कसा सांभाळणार, असा सवाल ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला आहे.खिशाला कात्रीमहागाईने साऱ्या देशाला वेठीस धरले असताना अर्थसंकल्पातील काही तरतुदी सोडता निराशाच झाली आहे. गृहिणी मिळालेल्या पैशात घर चालवतात. सोने या एकाच गोष्टीची हौस महिलांना असते. सोन्याचे दर वाढले तर आता बचतीच्या नावाखाली घेतले जाणारे सोनेही महिलांना घेणे जड जाईल. त्यामुळे एकंदरच क्षुल्लक वस्तुंमुळे खिशाला कात्री लागेल.-जयश्री तिवारी, गृहिणीगृहिणींची निराशा घरी बसून टीव्ही बघणे प्रत्येक गृहिणीला आवडते. पण आता केबलही महागणार आहे. त्यामुळे आता घरी राहणाऱ्या महिलांनी काय करावे हा प्रश्न आहे. सरकारने अर्थसंकल्पात खूप चांगल्या गोष्टींवर भर दिला आहे. पण ब्युटीपार्लर आणि केबलचे पैसे वाढवून मात्र गृहिणींची निराशा केली आहे.- राजश्री पाटणे, गृहिणीमोबाइल बिलाच्या वाढीमुळे निराशाहल्ली घरगुती उद्योगधंद्यातही मोबाईल महत्त्वाची भूमिका बजावतो. मोबाईल फोनवरुन काम अधिक जलद होते. पण आता बिल वाढणार या निर्णयामुळेच धडकी भरली आहे. आधीच फोन कंपन्यांची बिले गगनाला भिडलेली असतात. अमुक कर, तमुक कर, इंटरनेट आणि बरेच काही. त्यात सेवा करातील वाढ घरातून लघुउद्योग करणाऱ्या महिलांना त्रासदायक ठरणार आहे.- प्रमिला कोळंबकरमहिन्याचे बजेट कोलमडेलनोकरदार महिलांना कामाचा व्याप इतका असतो की, अनेकदा बाहेर जेवावे लागते. अन्नधान्याची महागाई तर आहेच. पण आता हॉटेल्सच्या सेवा करात वाढ झाल्यामुळे महिन्याचे बजेट नक्कीच कोलमडेल.-अपर्णा जाधव, गृहिणीकाटकसर करावी लागणार यंदाच्या बजेटमध्ये तरुणाईच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. पण मध्यमवर्गीयांना आहे, त्या पगारात भागवता नाकीनऊ येते. या अर्थसंकल्पाचे चांगले परिणाम होणार आहेच. पण त्याच बरोबर गृहिणींना काटकसर करावी लागणार आहे.-स्मिता बटा, गृहिणीअर्थसंकल्पाचे स्वागतनेहमीच अर्थसंकल्पातून पदरी निराशा पडत असते. पण यंदाच्या बजेटमध्ये काही समाधानकारक बदलही पाहायला मिळाले. तरुणांना उद्योगधंद्याकडे वळवण्यासाठी, चांगले शिक्षण देण्यासाठी, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करण्यासाठी चांगल्या तरतुदी असल्यातरी सेवा करातील वाढीचा मात्र मनस्ताप होणार आहे. सध्या तरी अर्थसंकल्पाचे स्वागत असून महागाई आटोक्यात आणण्याचा प्रयत्न व्हावा कारण मोदी सरकारकडून ‘अच्छेदिन’ची अपेक्षा आहे.- सुष्मा परब, नोकरदार