मुंबई : आपल्यापैकी अनेकजण हे टेलिकॉलर्स आणि स्पॅम कॉल्समुळे त्रस्त आहेत. टेलिकॉलर्स संपूर्ण दिवस कुठल्या ना कुठल्या प्रकारची स्कीम सांगण्यासाठी कॉल करत असतात. या टेलिकॉलर्सपासून सुटका मिळविण्यासाठी अनेकजण आपल्याकडे सेव नसलेल्या नंबरवरून येणारे कॉल्सही उचलत नाहीत. मात्र, याच दरम्यान काहीवेळा महत्त्वाचे कॉल्स मिस होतात. अशा वेळी काही सोप्या टिप्सच्या आधारे तुमची या कॉलपासून सुटका होऊ शकते.
कसे रोखाल अनवाँटेड कॉल्स? सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनच्या कॉल सेटिंग्जवर जाऊन कॉल फॉरवर्डिंग पर्यायावर क्लिक करा, तुम्हाला तीन पर्याय दिसतील. आल्वेज फॉरवर्ड, बीजी असताना फॉरवर्ड आणि अनॲनसर्ड असल्यास फॉरवर्ड असे पर्याय दिसतील. ऑल्वेज फॉरवर्ड पर्याय टॅप करा आणि बंद केलेला किंवा सुरू नसलेला नंबर प्रविष्ट करा.
...तर थेट साधा सायबर पोलिसांशी संपर्कअनोळखी क्रमांकावरून आलेला व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल स्वीकारू नका. तो क्रमांक लगेच ब्लॉक करा. आपल्याला बदनामीची भीती घालून कोणी ब्लॅकमेल करत असेल तर तत्काळ पोलिसांकडे तक्रार करा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. तसेच सर्व सोशल मीडिया अकाउंट्सची सेटिंग प्रायव्हेट ठेवा. समाजमाध्यमांवर अनोळख्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. त्यातही अनोळखी, सुंदर आणि तरुण मुलींचा फोटो असलेल्या अकाउंटपासून विशेष सावध राहा.
गेल्या १० महिन्यांतील गुन्हे
- मुंबई पोलिसांनी सायबरप्रकरणी ३ हजार ९६० गुन्हे नोंद आहे. त्यापैकी २४३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. ३९५ जणांना अटक करण्यात आली. यामध्ये सायबर फसवणुकीचे १८१७ गुन्हे नोंद आहे. त्यापैकी अवघ्या ६८ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
- अनोळखी नंबरवरूनच होते फसवणूक अनेकदा अनोळखी क्रमांकावरून कॉल करून नागरिकांच्या फसवणुकीच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे अशा कॉलपासून सावध राहावे लागेल.