लॉटरीसाठीचा फॉर्म कसा भरायचा? म्हाडा घेणार क्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 09:25 AM2024-08-18T09:25:32+5:302024-08-18T09:27:01+5:30

एकदिवसीय वेबिनारद्वारे अर्जदारांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार 

How to fill lottery form? Mhada will take class | लॉटरीसाठीचा फॉर्म कसा भरायचा? म्हाडा घेणार क्लास

लॉटरीसाठीचा फॉर्म कसा भरायचा? म्हाडा घेणार क्लास

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या २ हजार ३० घरांच्या लॉटरीसाठी अर्ज भरताना अर्जदारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तांत्रिक कारणांसह कोणती कागदपत्रे द्यायची, नाही द्यायची? असे अनेक प्रश्न अर्जदारांना पडले असून, याची उत्तरे देण्यासाठी म्हाडाकडून एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे अर्जदारांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्जदारांना अधिक सुलभतेने अर्ज सादर करता यावा, याकरिता म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे १९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता लाइव्ह वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. 

अर्जदारांच्या शंकांचे निरसन
म्हाडाच्या लॉटरीसाठी नोंदणी केलेल्या अर्जदारांना एसएमएसद्वारे व म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावरही लाइव्ह वेबिनारची लिंक उपलब्ध आहे. 
म्हाडाचे अधिकृत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज @mhadaofficial वरही या वेबिनारचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. 
वेबिनारमध्ये मुंबई मंडळाचे उपमुख्य अधिकारी राजेंद्र गायकवाड, म्हाडाच्या मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके, माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी संदीप बोदेले इच्छुक अर्जदारांच्या शंकांचे निरसन करून माहिती देणार आहेत.

 मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील २०३० घरांच्या विक्रीसाठी ९ ऑगस्टपासून म्हाडाचे संकेतस्थळ https://housing. mhada. gov.in व मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज नोंदणी व 
अर्ज स्वीकृती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.

Web Title: How to fill lottery form? Mhada will take class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा