आनंद आणि सकारात्मकता यांना चालना देणारे हॅप्पी हार्मोन्स अर्थात आनंदी संप्रेरक म्हणजेच मेंदूमध्ये तयार होणारे विशिष्ट रसायन हे महत्त्वाची भूमिका बजावतात. हे हार्मोन्स योग्य प्रमाणात तयार झाले, तर मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहते. तणाव, नैराश्य आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठी हॅप्पी हार्मोन्स सक्रिय करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होते आहे.
आजच्या व्यस्त जीवनामुळे लोकांमध्ये ताण तणाव, चीडचीड वाढते आहे. हे हार्मोन्स संदेशवाहक म्हणून मूड रेग्युलेशन करण्याचे काम करतात. या हार्मोन्समध्ये, नॉरड्रेनालाइन, डोपामाइन, सेरोटोनिन, एंडोर्फिन आणि फेनिलेथिलामाइन आदींचा समावेश आहे. नियमित व्यायाम करणे, आवडीची गाणी ऐकणे, चांगल्या आणि सकारात्मक सहवासात वेळ घालवणे, ध्यानमुद्रा करणे अशा विविध गोष्टी केल्याने हे हार्मोन्स शरीरात स्रवण्यास मदत होते. याकडे तज्ज्ञ लक्ष वेधतात.
हॅपी हार्मोन्सचे कार्यडोपामिन- मेंदूच्या बक्षीस प्रणालीमध्ये प्रेरक भूमिका असते.
ऑक्सिटोसिन- प्रेम आणि विश्वासाशी संबंधित असते.
एंडोर्फिन- तणाव आणि वेदना कमी करण्यास मदत करते. व्यायाम केल्यावर याची निर्मिती वाढते.
असा करा तणाव कमीतणाव कमी करण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. मन:शांतीसाठी ध्यान करणे उपयुक्त ठरते. लोकांनी स्कीन टाइमपासून ब्रेक घेऊन चारचौघांत मिसळणे, हसणे, गप्पा मारणे या गोष्टी हॅप्पी हार्मोन्ससाठी महत्त्वाच्या ठरतात.