कसे काढाल आभा हेल्थ कार्ड? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 03:00 PM2023-07-31T15:00:55+5:302023-07-31T15:11:34+5:30

राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे हेल्थ कार्ड आवश्यक आहे...

How to make Abha Health Card know about it | कसे काढाल आभा हेल्थ कार्ड? जाणून घ्या

कसे काढाल आभा हेल्थ कार्ड? जाणून घ्या

googlenewsNext

आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा (आभा) एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरू केला आहे. राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे हेल्थ कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

प्रक्रिया अशी...
-   भारतात कुठेही राहत असाल तरी तुमच्या मोबाइलद्वारे ऑनलाइन पद्धतीने हेल्थ कार्ड काढू शकता. 
-   कार्ड बनविण्यासाठी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर ( healthid.ndhm.gov.in) जावे.
-   नंतर होम पेजवर ‘Create ABHA Number’ असे बटन क्लिक करावे. 
-   त्यानंतर (ABHA) तयार करण्यासाठी दोन पर्याय दिसतील. तुम्ही तुमच्या आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करून कार्ड तयार करू शकता.

आवडत्या नावाचा ॲड्रेस...
-   आवडते नाव ABHA ॲड्रेस म्हणून तयार करावे. नंतर ABHA क्रमांक, ABHA ॲड्रेसला यशस्वीपणे लिंक झाल्याचा मेसेज दिसेल. नंतर Go Back to your ABHA… बटनवर क्लिक करावे.
-    त्यानंतर लॉगिनसाठी ABHA क्रमांक किंवा मोबाइल आणि जन्म वर्ष टाकून Continue बटन वर क्लिक करावे. पुढे OTP साठी मोबाइल विचारला जाईल. योग्य पर्याय निवडून Continue करावे. 
-    पुढच्या पेजवर तुमचे ABHA क्रमांक कार्ड/हेल्थ कार्ड तयार होऊन येईल. तुम्ही ते Download ABHA number Card बटनवर क्लिक करून डाउनलोड करू शकता.

हा पर्यायही उपलब्ध...
-   आधार कार्डला मोबाइल क्रमांक लिंक नसेल, तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सचा पर्याय निवडू शकता. 
-   आधार कार्ड टाकल्यानंतर ‘I Agree’ वर क्लिक करून ‘i am not robot’ वर क्लिक करावे. 
-   कॅप्चा व्यवस्थित भरावा. त्यानंतर ‘Submit’ बटनवर क्लिक करावे. 
-   मोबाइलवर ओटीपी येईल. तो बॉक्समध्ये टाकून ‘Next’ बटनवर क्लिक करावे. 
-   नंतर ‘Aadhaar Authentication Successful’ असा मेसेज दिसेल. तुमची वैयक्तिक माहिती तपासून Next बटनवर क्लिक करावे. नंतर मोबाइल क्रमांक टाकावा. जो ‘ABHA’ कार्डला लिंक होईल. 
-   पुढच्या पेजवर तुमचा ‘ABHA’ क्रमांक तयार झाल्याचा मेसेज दिसेल. हा १४ अंकी क्रमांक लक्षात ठेवणे कठीण जाते. त्यामुळे ‘आभा’ने आभा ॲड्रेस सुविधा दिली आहे. यात आवडते नाव ॲड्रेस म्हणून वापरू शकता. 
-   जसे, name1234@abdm त्यासाठी तुम्ही आधी ‘Link ABHA Address’ बटनवर क्लिक करा. नंतर ‘No’ वर टिक करून ‘Sign Up for ABHA Address’ बटनवर क्लिक करायचे आहे.
 

Web Title: How to make Abha Health Card know about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.