वीजबिल कसे भरू? आधी मीटर बदलून द्या साहेब!आता स्मार्ट मीटरच्या युगात मीटर बदलून घेण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 01:33 PM2023-11-10T13:33:25+5:302023-11-10T13:33:33+5:30

आता स्मार्ट मीटरच्या युगात मीटर बदलून घेण्यावर भर दिला जात असल्याने अडचणी कमी येत असल्याचा दावा वीज कंपन्यांनी केला आहे. 

How to pay electricity bill? First change the meter sir!Now focus on changing the meter in the age of smart meters | वीजबिल कसे भरू? आधी मीटर बदलून द्या साहेब!आता स्मार्ट मीटरच्या युगात मीटर बदलून घेण्यावर भर

वीजबिल कसे भरू? आधी मीटर बदलून द्या साहेब!आता स्मार्ट मीटरच्या युगात मीटर बदलून घेण्यावर भर

मुंबई :  शहर आणि उपनगरातील वीज ग्राहकांना तांत्रिक अडचणींमुळे बत्तीगुलला सामोरे जावे लागत असतानाच दुसरीकडे मीटरमध्ये बिघाड झाल्यास तो बदलून देण्यासाठी सरासरी दोन दिवस लागत आहेत. याचा परिणाम म्हणून वीज ग्राहकांना या कालावधीत अंधारात राहावे लागत आहे. दरम्यान, आता स्मार्ट मीटरच्या युगात मीटर बदलून घेण्यावर भर दिला जात असल्याने अडचणी कमी येत असल्याचा दावा वीज कंपन्यांनी केला आहे. 

टाटा पॉवर
  सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये ग्राहकांकडून मीटरच्या २७ तक्रारी प्राप्त झाल्या. 
  मीटर काम करत नसल्याबद्दल ग्राहकांच्या तक्रारींमध्ये वेगळे असे विभाजन नाही. तसेच ते सदोष मीटर म्हणून मानले जातात. 
  तक्रार मिळाल्यानंतर सरासरी २ दिवसांपेक्षा कमी कालावधीत सदोष मीटर बदलले जातात. 
  मीटर सदोष असल्याचे आढळल्यास वीज कंपन्यांकडून बदलले जातात. 
  स्मार्ट मीटरिंगसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी काहीवेळा वीज कंपनी स्वतःच मीटर बदलते. 

अदानी इलेक्ट्रिसिटी
  एका महिन्यात ग्राहकांकडून सरासरी २४० तक्रारी येतात. 
 ग्राहकांवर अवलंबून न राहता एसओपी नुसार मीटर बदलण्याची खात्री करतात. 
 तक्रार नोंदणीपासून निराकरण होईपर्यंत पारदर्शकता ठेवली जाते. 
 ग्राहकाने तक्रार केली की तंत्रज्ञ मीटरची तपासणी करतात. 
 मीटर सदोष आढळल्यास तंत्रज्ञाद्वारे मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. 

महावितरण
  ऑक्टोबर महिन्यात मीटर खराब असल्याच्या २२६ तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारी सोडविल्या. 
   मीटर बंद असल्याच्या ३१ तक्रारी ऑक्टोबर महिन्यात मिळाल्या. 
   एक दिवसापासून ते ३० दिवसांच्या आत वीज मीटर बदलून मिळतात. 
   सध्या मुबलक प्रमाणात वीज मीटर उपलब्ध आहेत. 
   ग्राहक महावितरणच्या संकेतस्थळावर अथवा मोबाईल ॲपवर तक्रार करू शकतात. 
   ग्राहक जवळच्या महावितरणच्या शाखा कार्यालयात सुद्धा अर्ज करू शकतात.

Web Title: How to pay electricity bill? First change the meter sir!Now focus on changing the meter in the age of smart meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज