Join us

वापर तेवढाच तरी वीज बिल कसे वाचवाल ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 2:41 PM

महावितरणने ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीद्वारे वीज देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मुंबई : डिजिटल माध्यमातून वीजबिल भरल्यास महावितरण ०.२५ टक्क्यापर्यंत सवलत ग्राहकांना देत असून,  गो ग्रीन योजनेत ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ई-मेलने येणाऱ्या पेपरलेस बिलाचा पर्याय स्वीकारला तर त्यांना कागदी बिल पाठविणे बंद केले जाते; आणि प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत देण्यात येते आहे. त्यामुळे ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणने ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीद्वारे वीज देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

आरटीजीएस -एनईएफटीद्वारे देयक भरणाकरण्यासाठी सुविधा सर्व लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक व १० हजारापेक्षा जास्त बिल असणाऱ्या लघुदाब घरगुती ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी लागणारी आवश्यक ग्राहकनिहाय बँकेच्या माहितीचा तपशील वीजबिलावर छापण्यात आलेला आहे.- महावितरण

६० टक्के ग्राहकांनी स्वीकारला ई-बिलचा पर्याय ८८ टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहक त्यांची बिले ऑनलाइन भरतात. टाटा पॉवरच्या ६० टक्के ग्राहकांनी ई-बिल सुविधेचा पर्याय स्वीकारला आहे. ४८ लाख कागदांची बचत होत आहे. ४८ हजार टन कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होते. ग्राहक पर्यावरणपूरकतेचा स्वीकार करण्यासाठी २४*७  टोल फ्री क्रमांक १९१२३ वर संपर्क साधू शकतील.    - टाटा पॉवर

- ग्राहक वीज देयकाचा भरणा क्रेडीट-डेबिट कार्ड, नेट बँकिंग व यू.पी.आय. इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत करु शकतो.-  भारत बिल पेमेंटवर वीजबिल भरणा करता येऊ शकतो.

क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व पद्धतीने वीज बिल भरणा नि:शुल्क आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने देयकाचा भरणा केल्यास बिल रकमेच्या ०.२५ (जास्तीत जास्त ५०० रुपये) इतकी सवलत देण्यात आली आहे.

टॅग्स :महावितरणवीज