मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळे लढण्याचा निर्णय आणि तयारीही झाली होती. मात्र, अमित शहा मातोश्रीवर आले. यामुळे मधल्या काळात काहीही घडलेले असले तरीही वर्षानुवर्षे आपली युती होती. आता पिढी बदलली. कदाचित त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे झालं असेल. पण पुन्हा संबंध सुधारत असतील आणि आपलं उद्दिष्ट आणि ध्येय एक असेल तर मार्ग धुंडाळत बसण्यापेक्षा झालं गेलं विसरून नवीन सुरुवात करायला काय हरकत आहे, अशी भूमिका लोकसभेला घेतल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सामनाचे संपादक आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कात्रीत अडकल्याचे म्हटले आहे.
लोकसभेवेळी मी अहमदाबादला अमित शहांचा अर्ज भरताना गेलो होतो. त्यानंतर वाराणसीलाही गेलो होतो. माझ्या मनात कुठेही मधल्या काळातली कटुता नव्हती. किंतु-परंतु नव्हता. किल्मिष मी ठेवलं नव्हतं. त्यापलीकडे जाऊन लोकसभेच्या वेळी युतीचा प्रचारही केला. हिंदुत्वासाठी विधानसभेलाही तडजोडी केल्याचे ठाकरे यांनी सांगितले. यावर प्रचारसभेवेळी नरेंद्र मोदी यांनी छोटा भाऊ म्हमून संबोधल्याची आठवण राऊत यांनी केली. यावर उद्धव ठाकरे यांनी खोचक उत्तर दिले. आपल्या पेक्षा वयाने मोठा असलेल्या माणसाचा मोठा भाऊ कसा होणार, असा सवाल त्यांनी केला. तसेच हे नाते टिकविण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. हा प्रयत्न दोन्हीकडून व्हाय़ला हवा होता अशी उद्विग्नताही ठाकरे यांनी व्यक्त केली.
यानंतर राऊत यांनी एकीकडे मोदी छोटा भाऊ म्हणत असताना दुसरीक़डे देवेंद्र फडणवीस तुम्हाला मोठा भाऊ म्हणायचे याचा अर्थ काय होता, असा प्रश्न विचारला. यावर ठाकरे यांनी उत्तर देताना या दोन भावांच्या कात्रीत मी अडकलो होतो, असे म्हटले.
मागल्या दाराने नव्हे, छप्पर फाडूनच आलोय; उद्धव ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तरम्हणे CAA लागू होऊ देणार नाही, अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का? ; शेलारांची वादग्रस्त टीका'...तर असं हिंदुत्व स्वीकारायला तयार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल...तर मी मुख्यमंत्री झालोच नसतो, उद्धव ठाकरेंचे विधान
स्वतः बाळासाहेबांनी जाहीर केलं होतं की, स्वतः कधीही निवडणूक लढवणार नाही. निवडणूकच लढवणार नाही म्हटल्यावर सत्तापदाचा प्रश्नच येत नाही. पण तरीदेखील त्यांच्यावरही या निर्णयावरून टीका झाली. तुम्ही हे बाहेरून बोलता, स्वतः करून दाखवा. ठीक आहे. मग मी आता स्वतः करून दाखवतो तुम्हाला, असा इशाराही ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे.