महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 05:08 AM2024-09-20T05:08:02+5:302024-09-20T05:08:26+5:30

अवघ्या ३ उमेदवारांना ४० हजारांहून अधिक मते, ५ उमेदवारांना ५ ते १० हजार मते आणि २ उमेदवारांना ५ हजारांपेक्षा कमी मते मिळाली होती.

How will the 'performance' of Maharashtra Navnirman Sena be? 25 seats were contested in Mumbai in 2019 | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा

महेश पवार

मुंबई : विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईच्या ३६ पैकी २५ जागा लढविल्या होत्या. २५ उमेदवारांमध्ये विलेपार्ले येथून जुईली शिंदे आणि मुलुंड या मतदारसंघातून हर्षला चव्हाण या दोन महिला उमेदवारांचा समावेश होता. एकूण ४,६२,५९४ मते मनसेच्या २५ उमेदवारांना मिळाली होती. अवघ्या ३ उमेदवारांना ४० हजारांहून अधिक मते, ५ उमेदवारांना ५ ते १० हजार मते आणि २ उमेदवारांना ५ हजारांपेक्षा कमी मते मिळाली होती.

मुंबई शहर आणि उपनगरांतील बोरीवली, जोगेश्वरी, चारकोप, मालाड (पश्चिम), अंधेरी (पूर्व), मानखुर्द - शिवाजीनगर, वांद्रे पश्चिम, वरळी, भायखळा, मलबार हिल आणि कुलाबा अशा ११ विधानसभा मतदारसंघांत त्यांनी उमेदवार दिले नव्हते. मुंबादेवीचे उमेदवार केशव मुळ्ये यांना सर्वांत कमी ३,१८५ इतकी तर, भांडुपचे संदीप जवळकर यांना सर्वाधिक ४२ हजार ७८२ मते मिळाली होती. विशेष म्हणजे कमी मते मिळूनही सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. यामध्ये नयन कदम (मागाठाणे), हर्षला चव्हाण (मुलुंड), संदीप जवळकर (भांडुप), सतीश पवार (घाटकोपर - पूर्व), संदीप देशपांडे (माहीम) आणि संतोष नलावडे (शिवडी) यांचा समावेश होता.

सर्वात कमी मते मिळवणारे...

किशोर राणे, (अंधेरी पश्चिम -६,८९१), विजय रावराणे, (अणुशक्ती नगर-५,८७९), संदेश देसाई, (वर्सोवा-५,०३७), संदीप कवाडे, (धारावी - ४,०६२), केशव मुळ्ये, (मुंबादेवी - ३,१८५)

‘टॉप फाइव्ह’ उमेदवार

मतदारसंघ      उमेदवाराचे नाव  मिळालेली मते

भांडुप   संदीप जवळकर  ४२,७८२

माहीम  संदीप देशपांडे    ४२,६९०

मागाठाणे       नयन कदम     ४१,०६०

शिवडी  संतोष नलावडे   ३८,३५०

मुलुंड   हर्षला चव्हाण    २९,९०५

Web Title: How will the 'performance' of Maharashtra Navnirman Sena be? 25 seats were contested in Mumbai in 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.