बनावट ईमेलविरोधात हृतिक रोशनची तक्रार
By admin | Published: December 13, 2014 01:25 AM2014-12-13T01:25:19+5:302014-12-13T01:25:19+5:30
अभिनेता हृतिक रोशनने मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना पत्र पाठवून आपल्या नावे बनावट ईमेल अकाऊन्ट उघडणा:या अनोळखी व्यक्तीची तक्रार केली आहे.
Next
मुंबई :अभिनेता हृतिक रोशनने मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना पत्र पाठवून आपल्या नावे बनावट ईमेल अकाऊन्ट उघडणा:या अनोळखी व्यक्तीची तक्रार केली आहे.
या बनावट ईमेल अकाउन्टद्वारे ही व्यक्ती हृतिक म्हणून बॉलीवूडमधील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि चाहत्यांशी संवाद साधते. बॉलीवूडमधूनच ही बाब माङया लक्षात आली. मी या सर्वाना संबंधील ईमेल आयडी माझा नाही हे सांगण्याचा प्रय} केला. मात्र त्यांचा विश्वास बसला नाही. या बनावट ईमेलमुळे सर्वाचीच फसवणूक सुरू आहे, असे हृतिकने या पत्रत लिहिले आहे. हे बनावट ईमेल आयडी तात्काळ बंद करावे आणि ते तयार करणा:याविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी विनंतीही त्याने आयुक्तांना केली आहे.
हृतिकच्या तक्रारीवर चौकशी सुरू आहे, अशी माहिती आयुक्त मारिया यांनी माध्यमांना दिली. तर पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास असून लवकरच बनावट ईमेल आयडी तयार करणारा गजाआड असेल, अशी प्रतिक्रिया हृतिकचे वकील अॅड. दिपेश मेहता यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)