मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या बारावीच्या निकालाची मोठी उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांना लागली होती. 31 जुलैपर्यंत हा निकाल जाहीर होणार असं सांगण्यात येत होत. मात्र, आता 3 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता हा निकाल जाहीर होणार असल्याचं शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.
बारावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे राज्य मंडळातर्फे अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला जात आहे. राज्य मंडळाच्या सूचनेनुसार शाळांनी संगणकीय प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे गुण जमा केले आहेत. आता विभागीय मंडळाकडून प्राप्त गुणांचे संकलन राज्य मंडळकडून केले जात आहे. मंडळाकडून ३१ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल, अशी विद्यार्थी व पालकांना अपेक्षा होती. परंतु, निकालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यात बारावीचा निकालांबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र, आता निकालाची तारीख निश्चित झाली आहे.
इथे पाहा निकाल