आजपासून बारावीच्या फेरपरीक्षा

By Admin | Published: July 9, 2016 03:34 AM2016-07-09T03:34:15+5:302016-07-09T03:34:15+5:30

विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून निकालानंतर महिन्याभरानंतर फेरपरीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी ९ जुलैपासून या परीक्षेला सुरुवात होत आहे.

HSC from today | आजपासून बारावीच्या फेरपरीक्षा

आजपासून बारावीच्या फेरपरीक्षा

googlenewsNext

नवी मुंबई : विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून निकालानंतर महिन्याभरानंतर फेरपरीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी ९ जुलैपासून या परीक्षेला सुरुवात होत आहे. ठाणे जिल्ह्यातील ८ हजार ५१८ विद्यार्थी परीक्षेला बसले असून, जिल्ह्यातील १२ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. विज्ञान शाखेतील २ हजार ५५३ विद्यार्थी, कला शाखेतील २ हजार १५०, वाणिज्य शाखेतील ३ हजार ७४७ तर एमसीव्हीसीचे (किमान कौशल्य) ६८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
सकाळी १०.३० ते १.३० आणि दुपारी २.३० ते ५.३० अशा दोनही सत्रात ही परीक्षा घेतली जाणार आहे. मुंबई विभागातील ५४ परीक्षा केंद्रांपैकी पालघरमध्ये ४, रायगडमध्ये ५, मुंबई दक्षिण विभागातील १४, मुंबई पश्चिम १४, मुंबई उत्तर ६ केंद्रावर परीक्षा होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: HSC from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.