मुंबईकरांना भरली हुडहुडी! गेल्या १० वर्षांतील नीचांकी कमाल तापमानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 09:51 AM2022-01-24T09:51:21+5:302022-01-24T09:51:49+5:30

तापमानातील घसरणीचा परिणाम; गेल्या १० वर्षांतील नीचांकी कमाल तापमानाची नोंद

Hudhudi full of Mumbaikars! Record lows and highs of last 10 years | मुंबईकरांना भरली हुडहुडी! गेल्या १० वर्षांतील नीचांकी कमाल तापमानाची नोंद

मुंबईकरांना भरली हुडहुडी! गेल्या १० वर्षांतील नीचांकी कमाल तापमानाची नोंद

Next

मुंबई : धुळीच्या वादळाने मुंबईकरांचा श्वास कोंडला असतानाच दुसरीकडे मुंबईच्या कमाल तापमानाने मुंबईकरांना हुडहुडी भरविली आहे. रविवारी मुंबईचे कमाल तापमान २३.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांतील हे नीचांकी कमाल तापमान असल्याची माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. दरम्यान, धुळीचे वादळ, पाऊस असे बदलते हवामान यास कारणीभूत असून, हवामानात झालेल्या बदलामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी व कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

मालाडची हवा जीवघेणी
nमुंबई शहर आणि उपनगरांत रविवारी हवेची गुणवत्ता अत्यंत खराब नोंदविण्यात आली असून, सर्वाधिक जीवघेणी हवा मालाड येथे नोंदविण्यात आली आहे. हवेच्या गुणवत्तेची नोंद करणाऱ्या सफर या यंत्रणेने मुंबईतल्या सर्व केंद्रांवर अत्यंत खराब हवा नोंदविण्यात आल्याचे म्हटले आहे. 
nयात माझगाव, वरळी, बीकेसी, अंधेरी, भांडूप, चेंबूर आणि मालाड अशा परिसरांचा समावेश आहे. या केंद्रावर हवा अत्यंत खराब नोंदविण्यात आली असली तरी संपूर्ण मुंबईची हवाच अत्यंत खराब नोंदविण्यात आल्याने मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन यंत्रणांनी केले आहे.
nसफरचे प्रकल्प संचालक डॉ. गुफरान बेग यांनी सांगितले की, उत्तर भारतात बहुतांशी ठिकाणी पावसाची नोंद झाली. याच मधल्या काळात हवा स्वच्छ झाली होती. फरकामुळे हवामानात बदल झाले आहेत. यामुळे धुळीचे वादळ उठले आहे. 

का उठले वादळ : मुंबई, गुजरात, राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांत तापमान जास्त होते. हवामान ऊबदार होते. याचवेळी उत्तर भारतात काही ठिकाणी पाऊस झाला. वेगवेगळ्या वातावरणामुळे यामधली धूळ वातावरणात मिसळली. परिणामी धुळीचे वादळ तयार झाले. हे वादळ याच ठिकाणाहून म्हणजे राजस्थान, गुजरातवरून खाली आहे. २४ तास वादळाचा जोर राहील. नंतर ते विरून जाईल.
 

मुंबईतील सूक्ष्म धुळीकणांचे प्रमाण / हवेची गुणवत्ता
कुलाबा :     खराब     २२१
माझगाव :     अत्यंत खराब     ३७२
वरळी :    अत्यंत खराब     ३१९
बीकेसी :      अत्यंत खराब     ३०७
अंधेरी :     अत्यंत खराब     ३४०
मालाड :     असह्य     ४३६
बोरीवली :  मध्यम     १६२
भांडूप :     अत्यंत खराब     ३३६
चेंबूर :     अत्यंत खराब     ३४७
नवी मुंबई:    मध्यम     १०१

Web Title: Hudhudi full of Mumbaikars! Record lows and highs of last 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.