लॉकडाऊनचा पहिला टप्पा संपत असताना महिनाभऱापूर्वी वांद्रे स्थानकात परप्रांतिय मजुरांची गर्दी झाल्याने गोंधळ उडाला होता. त्यावरून मोठ्या प्रमाणात राजकारणही रंगले होते. दरम्यान, आज सकाळी वांद्रे स्थानकाजवळ परप्रातीय मजुरांनी पुन्हा एकदा मोठी गर्दी केली. या गर्दीमुळे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचा पुरता बोजवारा उडाला. तसेच या गर्दीला अटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना आटोकाट प्रयत्न करावे लागले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत ३१ मेपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातही शासनाने मुंबईतील मजुरांना त्यांच्या घरी जाता यावे यासाठी विशेष ट्रेन सेवा सुरू केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन होणार नाही. याची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र तरीही लोक अगदी बेजबादारपणे वागत असल्याचे वारंवार समोर येत आहे. पुन्हा एकदा मुजरांनी मोठ्या संख्यने वांद्रे स्थानकासमोर गर्दी केल्याचा माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या कामगारांना सोमवारी रेल्वे जाणार असल्याचं फोन करून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांनी वांद्रे स्थानकावर गर्दी केल्याची माहिती आहे. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी जमलीस कशी, अफवा परवणा-याचा शोध आता घेतला जात आहे. तुर्तास या पोलिसांनी या मजुरांना चुकीची माहिती देण्यात आल्याचे सांगत त्यांना परत घरी पाठवण्यास यश आले आहे.
राज्यात आणि देशात लॉकडाऊन असताना मुंबईत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याची घटना वारंवार समोर येत आहेत.सोशल डिस्टसिंगचे नियम पाळा असे वारंवार प्रशासन सांगत आहे. एकच गोष्ट अनेकदा सांगून आता घशालाही कोरड आली असावी, मात्र काही अतिउत्साही लोक जराही विचार न करता अशाप्रखारे गर्दी करत इतरांनासाठी संकटाचे निमंत्रणच देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारची गर्दी १४ एप्रिल रोजी याच स्थानकाव झाली होती. कोणीतरी ट्रेन सुरू झाल्याची अफवा पसरवत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवण्याचा जाणूबुजुन प्रयत्न केला होता.