मोठय़ा पुलाची पोकळ सुरक्षा?
By admin | Published: August 20, 2014 01:25 AM2014-08-20T01:25:02+5:302014-08-20T01:25:02+5:30
सर्वात लांबीच्या अशा पादचारी पुलाचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून उद्घाटन करण्यात आले. मात्र 18 प्लॅटफॉर्मला जोडणा:या या पुलावरून गेल्यास सुरक्षेचा अभाव असल्याचे दिसून येते.
Next
1सीएसटीवर सर्वात लांबीच्या अशा पादचारी पुलाचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून उद्घाटन करण्यात आले. मात्र 18 प्लॅटफॉर्मला जोडणा:या या पुलावरून गेल्यास सुरक्षेचा अभाव असल्याचे दिसून येते. अत्यंत कमी वर्दळ असणा:या या पुलावर रेल्वेकडून कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली नाही.
2सीएसटी स्थानकात एक ते सात प्लॅटफॉर्म हे उपनगरीय लोकलसाठी आहेत. तर आठ ते अठरार्पयतचे प्लॅटफॉर्म हे लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी आहेत. हे पाहता या स्थानकावर मोठय़ा संख्येने प्रवाशांची ये-जा असते. सीएसटी स्थानकात एखादी लोकल आल्यास कल्याणच्या दिशेने असणा:या जुन्या पुलाचा वापर करून स्थानकाबाहेर पडणा:या प्रवाशांची संख्या अधिक आहे.
3अनेक जण पश्चिम दिशेला असणा:या जे.जे. फ्लायओव्हरकडे जाण्यासाठी जुन्या पुलाचाच अधिक वापर करतात. महत्त्वाची बाब म्हणजे पूर्वेला असणा:या पी.डिमेलो रोडकडे जाण्यासाठी तर प्रवाशांना पूर्ण सीएसटी स्थानकाला वळसा घालून जावे लागत होते. या सर्व बाबी पाहता मध्य रेल्वेने अठरा प्लॅटफॉर्मला जोडणारा सर्वात मोठा असा पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी साडेआठ कोटी रुपयांची तरतूद मध्य रेल्वेकडून करण्यात आली.
4हा पादचारी पूल 18 ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. मात्र सर्वात लांबीच्या या पुलावरून फेरफटका मारल्यास सुरक्षेचा अभावच असल्याचे दिसून येते. येथे एकही सीसीटीव्ही नाही की कॅमेराही नाही. त्याचबरोबर फक्त एकच रेल्वे पोलीस फेरफटका मारताना दिसतो. महत्त्वाची बाब म्हणजे स्थानकाबाहेरील अनेकांचा या पुलावर वावर वाढल्याचेच दिसते. याबाबत मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांनी सांगितले की, येत्या दहा ते पंधरा दिवसांत या पुलावर सीसीटीव्ही बसवण्यात येतील आणि गरज पडल्यास पोलिसांची संख्याही वाढवण्यात येईल.
दादर ते
परळ प्रवास होणार सुकर
च्दादरहून परळ आणि पुन्हा दादरला येण्यासाठी लोकल प्रवासात प्रचंड गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागतो. त्यावर मध्य रेल्वेकडून उपाय शोधला जात असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी सांगितले.
च्या दोन्ही स्टेशनदरम्यान लोकलचा वापर टाळण्यासाठी सेमिऑटोमॅटिक स्कायवॉकच बांधण्याचा विचार सुरू असल्याचे सूद म्हणाले. त्याचप्रमाणो परळ स्थानकातूनही जलद लोकल पकडता यावी यासाठी या स्थानकात जलद लोकलला थांबा देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
च्परळ आणि दादर स्थानकातील अंतर हे खूपच कमी असल्याने हा थांबा देता येणोही अशक्य असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.