ऑक्सिजन सिलिंडरचा प्रचंड तुटवडा!, अखंड पुरवठ्यासाठी राज्यभर समित्या, जिल्हास्तरावर कंट्रोल रूम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 03:25 AM2020-09-13T03:25:19+5:302020-09-13T06:38:13+5:30

आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक महसूल विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी ५० ड्युरा सिलिंंडर आणि २०० जम्बो सिलिंडर यांचा राखीव साठा ठेवण्याबाबत विभागीय आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली.

Huge shortage of oxygen cylinders !, Committees across the state for uninterrupted supply, control rooms at district level | ऑक्सिजन सिलिंडरचा प्रचंड तुटवडा!, अखंड पुरवठ्यासाठी राज्यभर समित्या, जिल्हास्तरावर कंट्रोल रूम

ऑक्सिजन सिलिंडरचा प्रचंड तुटवडा!, अखंड पुरवठ्यासाठी राज्यभर समित्या, जिल्हास्तरावर कंट्रोल रूम

Next

मुंबई : कोरोना रुग्णांसाठीच्या आॅक्सिजन सिलिंडरचा सर्वत्र तुटवडा भासत असल्याचे चित्र असून त्याअभावी रुग्ण दगावत असल्याच्या तक्रारीदेखील मोठ्या प्रमाणात येत आहेत. या पार्श्वभूमीवर, गंभीर रुग्णांवर उपचारासाठी वेळेवर आॅक्सिजन मिळावा तसेच आॅक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा यासाठी याच्या नियंत्रणाकरिता जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर समित्यांची स्थापना करतानाच जिल्हास्तरावर कंट्रोल रूम सुरू करण्यात आले आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक महसूल विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी ५० ड्युरा सिलिंंडर आणि २०० जम्बो सिलिंडर यांचा राखीव साठा ठेवण्याबाबत विभागीय आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली. टोपे यांनी राष्ट्रीय आॅक्सिजन उत्पादक संघटनेच्या अध्यक्षांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून राज्याला पुरेशा प्रमाणात आॅक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी सूचना दिल्या. राज्याची आॅक्सिजनची गरज ४०० मेट्रिक टन एवढी असून उत्पादन क्षमता १०८१ मेट्रिक टन आहे. सध्या राज्यात आॅक्सिजनचे जंबो सिलिंडर १७ हजार ७५३, बी टाइप सिलिंडर - १५४७, ड्युरा सिलिंडर - २३०, लिक्विड क्रायोजनिक आॅक्सिजन टँक १४ असून आणखी १६ ठिकाणी काम सुरू असल्याचा दावा सरकारने केला आहे.
जिल्हावार नोडल अधिकारी नेमले आहेत. राज्यस्तरावर अन्न व औषध प्रशासनामार्फत कंट्रोल रूम सुरू करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक ०२२-२६५९२३६४ असून टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ असा आहे.
क्रायो आॅक्सिजन टँक
शंभर किंवा त्याहून अधिक खाटा असलेल्या सार्वजनिक रुग्णालयांनी निधी प्राप्त करून क्रायो आॅक्सिजन टँक स्थापन करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: Huge shortage of oxygen cylinders !, Committees across the state for uninterrupted supply, control rooms at district level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.