fsharetweetwhatsapp
शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार
By admin | Published: October 1, 2014 03:07 AM2014-10-01T03:07:22+5:302014-10-01T03:07:22+5:30
मंगळवारी सकाळी शेअर बाजारांनी जोरदार उसळी घेतली खरी; मात्र नंतर झालेल्या नफा वसुलीने बाजार खाली आले.
>मुंबई : मंगळवारी सकाळी शेअर बाजारांनी जोरदार उसळी घेतली खरी; मात्र नंतर झालेल्या नफा वसुलीने बाजार खाली आले. मोठय़ा चढ-उतारानंतर दिवस अखेरीस सेन्सेक्सने 33 अंकांची, तर निफ्टीने 8.90 अंकांची वाढ नोंदविली.
रिझव्र्ह बँकेने आज पतधोरणाचा आढावा घेताना धोरणात्मक व्याजदरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे बाजारात आजचे चढ-उतार दिसून आले. धातू आणि ऊर्जा क्षेत्रतील कंपन्यांत प्रामुख्याने आजची नफावसुली दिसून आली. नफावसुलीचे हे सत्र बुधवारीही सुरू राहण्याची शक्यता आहे, असे सूत्रंनी सांगितले.
30 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीने उघडला होता. दुपार्पयत 254.22 अंकांची वाढ नोंदवून सेन्सेक्स 26,851.33 अंकांवर पोहोचला होता. त्यानंतर मात्र नफावसुलीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे बाजार हळूहळू कोसळू लागला. कमावलेले बहुतांश अंक गमावल्यानंतर सेन्सेक्स 33.40 अंकांच्या वाढीसह 26,630.51 अंकांवर बंद झाला. कालच्या तुलनेत आजची वाढ 0.13 टक्के
आहे.
व्यापक आधार असलेला 50 कंपन्यांच्या शेअर्सचा सीएनएक्स निफ्टी 8.90 अंकांच्या वाढीसह 7,964.80 अंकांवर बंद झाला.
ब्रोकरांनी सांगितले की, आशियाई बाजारात आज नरमाईचा कल दिसून आला. हाँगकाँगमधील तणावाचा बाजारांवर परिणाम झाल्याचे दिसून आले. आशियाई बाजारात 0.32 ते 1.28 टक्क्यांची घसरण दिसून आली. युरोपीय बाजारात सकाळच्या सत्रत चांगली स्थिती होती. डॅक्स आणि कॅक 1.01 टक्के ते 0.65 टक्क्यांची वाढ दिसून आली. (प्रतिनिधी)
4सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 14 कंपन्यांना तेजीचा लाभ झाला. सनफार्मा, एचडीएफसी, बजाज ऑटो, मारुती, सिप्ला आरआयएल, आयटीसी यांचा लाभ मिळालेल्या कंपन्यांमध्ये समावेश आहे.
4भेल, अॅक्सिस, हिंदाल्को, एमअँडएम, टाटा मोटर्स, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक आणि टीसीएस यांचे शेअर्स मात्र कोसळले.
4सेन्सेक्स अल्प का होईना, पण वर चढला असला तरी एकूण बाजाराचा विचार करता नकारात्मक कल दिसून आला.
41,539 कंपन्यांचे शेअर्स कोसळले, तर 1,347 कंपन्यांचे शेअर्स वर चढले. बाजारात एकूण 3,820.54 कोटी रुपयांचे व्यवहार झाले.