Join us

‘मिठी’ होणार मुक्त!

By admin | Published: January 20, 2015 2:43 AM

नदीच्या सर्व्हिस रोडवरील झोपड्या येत्या आठ दिवसांत पाडून टाकण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांना दिले.

सरकारचे आदेश : १८०० अनधिकृत बांधकामे पाडामुंबई : मिठी नदीच्या काठावरील १८०० अनधिकृत बांधकामे एप्रिल महिन्याअखेर तर नदीच्या सर्व्हिस रोडवरील झोपड्या येत्या आठ दिवसांत पाडून टाकण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांना दिले. नदीच्या परिसरात झोपड्या उभ्या करणाऱ्या विकासकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही कदम यांनी दिले.कदम यांनी ‘मिठी’ परिसरास सोमवारी भेट दिली. नदीत ४३ ठिकाणांहून येणारे सांडपाणी खोल समुद्रात सोडा अथवा त्यावर प्रक्रिया करून ते मिठी नदीत सोडा, असे कदम यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. काही विकासकांनी नदीच्या सर्व्हिस रोडवर झोपड्या उभारल्याची बाब कदम यांच्या निदर्शनास आणली असता अशा विकासकांवर कारवाई करण्यास त्यांनी सांगितले. महापौर स्नेहल आंबेकर या वेळी उपस्थित होत्या. (विशेष प्रतिनिधी)विहार तलावापासून माहीम कॉजवेपर्यंत वाहणारी मिठी नदी दोन वर्षांत प्रदूषण व अनधिकृत बांधकाममुक्त करून येथील स्वच्छ पाण्यात पर्यटन सुरू करण्याची घोषणा कदम यांनी केली.