भायखळा कारागृहात आज मानवी हक्क आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 06:33 AM2018-07-16T06:33:38+5:302018-07-16T06:33:41+5:30

वॉर्डन मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग भायखळा कारागृहाची आज पाहणी करणार आहे

Human Rights Commission today in Byculla Prison | भायखळा कारागृहात आज मानवी हक्क आयोग

भायखळा कारागृहात आज मानवी हक्क आयोग

Next

मुंबई : वॉर्डन मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग भायखळा कारागृहाची आज पाहणी करणार आहे आणि नागपाडा पोलीस ठाण्याला भेट देणार आहे. याबाबतचे पत्रदेखील तुरुंग प्रशासन विभागास प्राप्त झाले असल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बी. के. उपाध्याय यांनी सांगितले.
गेल्या वर्षी २३ जून रोजी भायखळा कारागृहात वॉर्डन मंजुळा शेट्येला जेल अधीक्षक मनीषा पोखरकरसह महिला जेल पोलीस बिंदू नाईक, वसिमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे यांनी मारहाण केली.
या मारहाणीत २४ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सहाही जणींना हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात त्या अजूनही कोठडीत आहेत.

Web Title: Human Rights Commission today in Byculla Prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.