पॅलेस्टिनीवरील अत्याचाराचा मानवाधिकार संघटनांकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:07 AM2021-05-11T04:07:19+5:302021-05-11T04:07:19+5:30
* इस्रायलवर बहिष्काराची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : इस्रायलमध्ये अल-अक्सा मशिदीत जमलेल्या पॅलेस्टिनीवर पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचाराचा ...
* इस्रायलवर बहिष्काराची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इस्रायलमध्ये अल-अक्सा मशिदीत जमलेल्या पॅलेस्टिनीवर पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचाराचा मुंबईतील मानवाधिकार संघटना व मुस्लिम संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. केंद्र सरकारने या हल्ल्याचा निषेध करून इस्रायल सरकारवर बहिष्कार घालावा, अशी मागणी सोमवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत एकमताने करण्यात आली.
अल-अक्सा मशिदीत मुस्लिमांवर इस्रायलच्या पोलिसांच्या गोळीबारमध्ये सुमारे १७८ पॅलेस्टाईन जखमी झाले. त्यापैकी ८८ गंभीर जखमी आहेत. संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्रायलच्या या कृत्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. इस्रायलचा आंतरराष्ट्रीय स्तरावर बहिष्कार टाकला पाहिजे, न्यायी देशांनी तातडीने इस्रायलशी त्यांचे मुत्सद्दी संबंध स्थगित केले पाहिजेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी ऑल इंडिया उलेमा काउन्सिलचे सरचिटणीस मौलाना महमूद दरियाबादी, शिया पर्सनल लेबर बोर्डचे उपाध्यक्ष मौलाना झहीर अब्बास रिझवी, मौलाना इजाज काश्मिरी, मौलाना अस्लम सय्यद, मुंबई पीस कमिटीचे फरीद शेख सद्दार, ह्युमन वेल्फेअर मुमेंटचे अध्यक्ष डॉ. अजीमुदीन, जमाते ए -इस्लामी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष डॉ. सलिम खान आदींनी मते मांडली.