Join us

हुंदका... हुरहुर... चिंता...उपचार सुरू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 5:19 AM

भेंडीबाजार येथील इमारत दुर्घटनेतील जखमींवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या वेळी आपल्या माणसांच्या शोधासाठी कुटुंबीयांनी रुग्णालयात गर्दी केली.

मुंबई : भेंडीबाजार येथील इमारत दुर्घटनेतील जखमींवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या वेळी आपल्या माणसांच्या शोधासाठी कुटुंबीयांनी रुग्णालयात गर्दी केली. कुटुंबीयांच्या चेहºयावर एकाच वेळी हुरहुर आणि चिंता होती.जे. जे. रुग्णालयात ‘माझा मुलगा सापडत नाहीये... कुणीतरी सांगा ना कुठेय तो... असे काळजीने विचारत मातेने हंबरडा फोडला. त्यानंतर अचानक चार ते पाच तासांनी मुलगा रुग्णालयात सुखरूप असल्याचे समजल्यावर तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले.सर जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले की, पाच जण गंभीर असून त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. अन्य जखमींची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावरही उपचार सुरू ठेवण्यात आले आहेत.अन् चिमुरड्यांनी जीव गमावलासलमान रिझवी यांचा भाऊ या इमारतीच्या दुसºया मजल्यावर राहत होता. त्यांची १४ वर्षीय भाची फातिमा आणि १८ वर्षांचा पुतण्या जमान यांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली होती. दोघेही तेथे नसल्याने सर्वच घाबरले. दुपारी १२नंतर त्यांचा मृतदेह ढिगाºयातून काढण्यात आले. त्यांच्या आई-वडिलांचा शोध अद्याप लागलेला नाही.सहा महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यूइमारत दुर्घटनेत सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचाही मृत्यू ओढावला. सकीना चष्मावाला असे या महिलेचे नाव असून, ही महिला ३५ वर्षांची होती. सकीनाच्या पतीचा अजूनही शोध लागलेला नाही. सकीनाच्या सासू ६५ वर्षीय तस्नीम यांच्या डोक्यालाही मार लागला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सकीनाची मोठी मुलगी शाळेत असल्याने ती बचावली.जे.जे.तील शस्त्रक्रिया रद्दइमारत दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने रुग्णालयातील दिवसभरातील अन्य शस्त्रक्रिया रद्द केल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. रुग्णालयाला भेट देऊन त्यांनी उपचारांचा आढावा घेतला.‘त्या’ लहानग्यांचाजीव वाचलाकोसळलेल्या इमारतीत पहिल्या मजल्यावर एका खोलीत ‘ट्युलिप’ नर्सरी कम प्लेग्रुप आहे. दरदिवशी सकाळी १०च्या सुमारास या ठिकाणी लहानग्यांचा किलबिलाट असतो. मात्र गुरुवारी नर्सरी सुरू होण्याआधीच सकाळी ८.२०च्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे लहानग्यांचा जीव वाचल्याचे स्थानिक महिलेने सांगितले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका