शतकोत्तर श्री राम उत्सव
By admin | Published: March 28, 2015 10:33 PM2015-03-28T22:33:30+5:302015-03-28T22:33:30+5:30
अंबरनाथमधील सर्वात जुने राम मंदिर म्हणून कोहजगावातील राम मंदिराची ओळख आहे. या मंदिरात गेल्या १०९ वर्षांपासून राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.
अंबरनाथ : अंबरनाथमधील सर्वात जुने राम मंदिर म्हणून कोहजगावातील राम मंदिराची ओळख आहे. या मंदिरात गेल्या १०९ वर्षांपासून राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यंदाही राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेली दिन दिवस मंदिरात किर्तन आणि भजन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
कोहजगांव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने दरवर्षी रामनवमी साजरी करण्यात येते. नगरसेवक प्रदिप पाटील, मधुकर पाटील, रामदास पाटील, शाम रसाळ, उमेश पाटील आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने यंदा हा उत्सव मंदिराच्या आवारात साजरा करण्यात आला. दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव साजरा झाल्यावर मंदिरात दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. संपूर्ण शहरातून भक्त या मंदिरात दर्शनासाठी येतात. सायंकाळी रामाची भव्य पालखी गावातून काढण्यात आली. ही पालखी वांद्रापाडा हनुमान मंदिरात जाऊन पुन्हा राम मंदिरात आणली जाते.
कवाड ते गणेशपुरी पदयात्रा पालखी सोहळा
अनगाव : कवाड जयहनुमान मित्रमंडळाच्या वतीने कवाड ते श्रीक्षेत्र गणेशपुरी पदयात्रा पालखी सोहळ््याचे आयोजन केले होते. जय श्रीरामाचा जयघोष करीत शेकडो भक्तांनी पदयात्रा काढली.
खंबाळात भाविकांची प्रचंड गर्दी
अंबाडी: खंबाळा येथे श्रीरामनवमी निमित्ताने येथील श्री साई मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आजही श्री रामनवमी निमित्ताने भजन, किर्तन व श्री रामप्रभू यांची पालखी काढली.
भार्इंदर : शहरातील राम मंदिरांत रामनवमी उत्सव उत्साहाने साजरी करण्यात आली. यानिमित्त मंदिरांना फुलांसह विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मध्यरात्री रामाचा जन्म झाल्याने पारंपारिक पद्धतीने रामाचा पाळणा पठण करण्यात आला. त्यावेळी भक्तांना सुंठवड्याचे वाटप करण्यात आले. ठिकठिकाणच्या मंदिरांत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
भिवंडी : चैत्र शुध्द नवमी श्रीराम जन्म दिवसाच्या निमीत्ताने शहरांतील बाजारपेठेतील काळाराम मंदिर व गोराराम मंदिरात शुनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास भाविकांनी जन्मोत्सव साजरा केला. शहरांतील मुळनिवासी नागरिकांनी व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी ही दोन मंदिरे स्थापन केल्याने वर्षानुवर्षे या पुरातन राम मंदिरात शहरांतील भावीक श्रध्देने दर्शनासाठी येत असतात.
४ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात शनिवारी राम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. ठाण्यातील खोपट आणि कोपीनेश्वर मंदिरात रात्रीपासूनच राम जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात सुरु होता. मुंब्य्रातही राम नवमीचा उत्सव साजरा झाला.
४राम नवमी निमित्त येथील कोपीनेश्वर मंदिरात रामाच्या जन्मोत्सवाचा सोहळा रंगला होता. भक्तांनी रामाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच मंदिरात रांगा लावल्या होत्या. मुंब्य्रातही रामनवमी निमित्त येथील रेल्वे स्थानका जवळील प्रमुख बाजारपेठेतील पुरातन विठ्ठल मंदिरात श्रीराम जन्मोउत्सवाचा नेत्रदिपक सोहळा आयोजिला होता. तसेच भजन,कीर्तन आदी धामिँक कार्यक्र मांचेही आयोजन केले होते.