बनावट एटीएम कार्ड वापरून शेकडो बँक खात्यांवर डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 02:19 AM2020-01-09T02:19:12+5:302020-01-09T02:19:19+5:30

मुंबई पश्चिम उपनगरात बनावट एटीएम कार्डचा वापर करत शंभराहून अधिक लोकांच्या बँक खात्यातून पैसे काढणाऱ्या टोळीचा बुधवारी पदार्फाश करण्यात आला आहे.

hundreds of bank accounts using fake ATM cards | बनावट एटीएम कार्ड वापरून शेकडो बँक खात्यांवर डल्ला

बनावट एटीएम कार्ड वापरून शेकडो बँक खात्यांवर डल्ला

Next

मुंबई: मुंबई पश्चिम उपनगरात बनावट एटीएम कार्डचा वापर करत शंभराहून अधिक लोकांच्या बँक खात्यातून पैसे काढणाऱ्या टोळीचा बुधवारी पदार्फाश करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ८ ने केली असुन या संशयित आरोपींनी पेट्रोल पंपमधुन बँक डेटा चोरी केल्याचे वरिष्ठ अधिकाºयाचे म्हणणे आहे.
रितेश अगरवाल, गौडा, लोकरे आणि अजुन एका साथीदाराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. अंधेरी, जोगेश्वरी परिसरात बनावट एटीएम कार्ड वापरून नागरिकांच्या बँक खात्यातुन पैसे काढणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती कक्ष ८ चे प्रमुख अजय जोशी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक दिपक सावंत, महेश तोगरवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक कारंडे आणि शेलकर यांच्या नेतृत्वाखाली चार पथके तयार केली. या पथकांनी अंधेरी आणि जोगेश्वरीत एटीएम असलेल्या ठिकाणी सापळा रचला. ७ जानेवारी, २०१९ रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास विशाल हॉलसमोर लाल रंगाची स्कोडा आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमजवळ थांबली. ही बाब सावंत आणि त्यांच्या पथकाच्या लक्षात येताच ते सतर्क झाले. त्या कारमधील इसमाचे संशयीत हावभाव पाहून सावंत यांच्या पथकाने गाडीला घेराव चालत अगरवाल आणि त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले. मीरा रोड परिसरात असलेल्या एच पी पेट्रोल पंपावर गौडा आणि लोकरे काम करायचे. ते ग्राहकांच्या कार्डची माहिती अगरवालला पोहोचवायचे. त्याचा वापर करत कार्ड रीडरच्या मदतीने तो बनावट कार्ड बनवायचा. ही कार्ड वावरून ते एटीएम कार्ड मार्फत पैसे काढायचे.संबंधित प्रकरणातील तक्रारदार हे मीरा रोडमध्ये काही गेले होते. तेव्हा त्यांनी पेट्रोल भरवले आणि कार्डने त्याचे बिल दिले. त्यांच्या कार्डची माहिती लोकरे आणि गौडा या दोघांनी अगरवाल यांना दिली.

Web Title: hundreds of bank accounts using fake ATM cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.