जात पंचायतच्या विरोधी कायद्यान्वये शंभर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:06 AM2021-05-20T04:06:26+5:302021-05-20T04:06:26+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जात पंचायतच्या विरोधी कायद्यान्वये राज्यभरात शंभर गुन्हे दाखल झाल्याची ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जात पंचायतच्या विरोधी कायद्यान्वये राज्यभरात शंभर गुन्हे दाखल झाल्याची माहिती राज्याचे नागरी हक्क संरक्षण विभागाचे अतिरिक्त महासंचालक विनय कारगावकर यांनी दिल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले. जात पंचायतच्या घटनांमध्ये पोलिसांनी स्वतः होऊन गुन्हे दाखल करण्याचे परिपत्रक काढणार असल्याचे देखील सांगण्यात आले. शासनाने ३ जुलै २०१७ रोजी जात पंचायतच्या मनमानी विरोधातील सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा संमत केला. या कायद्याचा आधार घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जात पंचायत मूठमाती अभियान स्थापन झाले. जात पंचायतच्या अनिष्ट व अघोरी घटना समोर येत असल्याने सरकारने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा बनविला. समिती व जात पंचायत मूठमाती अभियान या कायद्याचा प्रसार करत आहे; परंतु मर्यादा व क्षमता याचा विचार करता हे प्रयत्न अपुरे असल्याने सरकारने कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. कायद्याची नियमावली लवकर तयार करावी, अशी मागणीही पाटील व चांदगुडे यांनी केली.
......................................................