Join us

अग्निकल्लोळातून दीडशे जणांना ‘राहत’!

By admin | Published: April 13, 2016 2:23 AM

नागाव कासीमपुरा येथील ‘राहत मंज़िल’ या चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोदामास लागलेल्या भीषण आगीतून दीडशे जणांचे प्राच वाचले. मंगळवारी सकाळी साडेसहा

भिवंडी : नागाव कासीमपुरा येथील ‘राहत मंज़िल’ या चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोदामास लागलेल्या भीषण आगीतून दीडशे जणांचे प्राच वाचले. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता लागलेली ही भीषण आग तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलास यश आले. आगीत अडकलेल्यांना वाचविण्याकरिता मदत कार्यात भाग घेतलेले सहा जण किरकोळ जखमी झाले. सलामतपुरा-कासीमपुरा या भागातील ‘राहत मंज़िल’ या चार मजली इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना, पहिल्या मजल्यावर कापड व धाग्याचा साठा केलेले गोदाम व त्यावरील दोन मजल्यांवरील ६६ फ्लॅटमध्ये रहिवाशांचे वास्तव्य अशी येथील रचना होती. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीने भयभीत झालेल्या सुमारे दीडशे जणांनी इमारतीच्या गच्चीत आसरा घेतला. धुराचे लोळ आणि आगीची धग यापासून अग्निशमन दलाने त्यांची सुखरूप सुटका केल्याने मोठी जीवितहानी टळली.